शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जो देशाला तोडेल, त्याला मी फोडेन!

By admin | Updated: May 2, 2017 04:55 IST

भाजपा सरकार संविधान बदलणार, अशा खोट्या आरोळ्या विरोधक देत असतात. मग मी कशाला तिथे आहे? डॉ. बाबासाहेबांच्या

पनवेल : भाजपा सरकार संविधान बदलणार, अशा खोट्या आरोळ्या विरोधक देत असतात. मग मी कशाला तिथे आहे? डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच देश आहे. जो देशाला तोडेल, त्याला मी फोडेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी दिली असून, वाटेल ते झाले, तरी मी समाजाला न्याय देणार, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी के ले.खारघर येथे रविवारी प्रीती ठोकळे यांनी आयोजित महापुरु षांच्या संयुक्त जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्र माला माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर हेही उपस्थित होते. रामदास आठवले यांनी आपल्या काव्यमय विनोदी शैलीत, तर कधी गंभीर होत उपस्थितांची मने जिंकली. भाजपा सरकारच्या नोटाबंदीचे जोरदार समर्थन आठवले यांनी केले. जेव्हा क्र ांती होते, तेव्हा त्रास होतोच, असे सांगितले. याचा अर्थ, एटीएमच्या लाइनमध्ये उभ्या असलेल्या जनतेला त्रास व्हावा, असे नाही, तर सर्वांना सांगून हा निर्णय घेतला असता, तर काय झाले असते ते सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे केंद्र सरकारने तडकाफडकी निर्णय घेतला ते योग्यच केले, असे ते म्हणाले. ‘भीम’ अ‍ॅपची नवी संकल्पना केंद्र सरकारने सुरू केली असून, तिचाही लाभ घ्या, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके उभी करायला घेतली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘महासत्ता भारत’ बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समर्थ महाराष्ट्र घडवायचा आहे, असे आ. प्रशांत ठाकू र यांनी सांगितले. या कार्यक्र माला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपा ज्येष्ठ नेते अभिमन्यू पाटील, शंकर ठाकूर, अनंता तोडेकर, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष लीना गरड, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)देशाविरोधात लढणाऱ्यांच्या मी नेहमीच विरोधात उभा राहिलो आहे. सध्या सुरू करण्यात आलेले ‘भीम’ अ‍ॅप ही केंद्र सरकारची नवी संकल्पना अतिशय चांगली आहे. उपयुक्त आहे. त्यामुळे तिचा वापर सर्वांनी करायलाच हवा, असे आवाहनही आठवले यांनी या वेळी केले.