शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागरी परिवहनसाठी एक हजार कोटी

By admin | Updated: March 27, 2015 01:27 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) नव्या आर्थिक वर्षातील ३ हजार ८३२.३० कोटीच्या अर्थसंकल्प गुरुवारी मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) नव्या आर्थिक वर्षातील ३ हजार ८३२.३० कोटीच्या अर्थसंकल्प गुरुवारी मंजूर करण्यात आला आहे. मुंबईतील नागरी परिवहन प्रकल्पासाठी सर्वाधिक एक हजार ५ कोटींची तरतूद करण्यात आलेली असून पूर्णपणे तोट्यात चाललेल्या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी ४०२.६० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. भाजपाशिवाय सर्व राजकीय पक्ष व मुंबईकरांचा विरोध वाढत असलेल्या मेट्रो-३ साठी १८० कोटींची तरतूद केलेली आहे.मुख्यमंत्री व प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत २०१५-१६ या वर्षातील अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यामध्ये छेडानगरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी दोन उड्डाणपूल व एक उन्नत मार्ग बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे.मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-१ व प्रकल्प-२ च्या अंतर्गत छत्रपती शिवाजी टर्मिनस व कुर्ला दरम्यान पाचवा, सहावा रेल्वे मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान ६वा, हार्बर मार्गावर अंधेरीपासून गोरेगावपर्यंतचे विस्तारीकरण, डीसीचे एसीमध्ये रुपांतर, आधुनिक पद्धतीच्या ईएमयुचे उत्पादन, त्याची देखभाल व स्टेबलिंग, तांत्रिक सहाय्य व स्थानक सुधारणा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी १००५ कोटीची तरतूद आहे. अर्नाळा-विरार-शिरसाड, अंबाडी-वाशिंद हा राष्ट्रीय महामार्ग क्र.८, कल्याण-बदलापूर-कर्जत-हलफाटा रा.मा.क्रं.३५, कर्जत ते हाळफाटा रा.मा.क्र.३८, कटाई-नाका-बदलापूर रा.मा.क्र.४३ यांचे रुंदीकरण आणि सुधारणा केल्या जातील. त्याचप्रमाणे रिंगरोड, शिरगाव व बदलापूरला जोडणारा रस्ता, नेरळ-दस्तूरी मार्ग, आणि सौंदर्यीकरण व माथेरान येथील स्थळाचा विकास केला जाईल.प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने शिफारस केलेल्या वसई-पश्चिम आणि भाईदरला जोडणाऱ्या ३+३ मार्गिकेच्या ५ किलोमीटर लांबीच्या खाडीच्या पूलाला मान्यता दिली आहे. त्यासाठी अंदाजे ८७५.५४ कोटीची तरतूद केली आहे. मोनो-२ चे काम अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षापर्यत पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली असून याकामासाठी ४०२.६० कोटीची तरतूद केली आहे. मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी प्राधिकरणातर्फे १६१.४७ कोटीची तरतूद असून त्यामध्ये खेरवाडी उड्डाणपूलाची उत्तरेकडील बाजू, बीकेसीतील ‘जी’ ब्लॉकपासून चुनाभट्टीपर्यतचा उन्नत माग आणि अंधेरी-घाटकोपर जोडरस्ता ही कामे मार्गी लावली जाणार आहेत. आजच्या बैठकीला महानगर आयुक्त यु.पी.एस.मदान, अतिरिक्त महानगर आयुक्त संजय सेठी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)च्मेट्रो-३चे आरेतील कारडेपो आणि गिरगावातील नियोजित भुयारी मार्गाबाबत मुंबईकरांचा विरोध वाढत चालला असून भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांनी त्यात उडी घेतली आहे. च्कुलाबा-वांद्रे-सीफ्झ मार्गावरील भूयारी मार्गाच्या या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मात्र पूर्णपणे पाठराखण केली आहे. ते म्हणाले,‘ शहर व महानगरात सहज व सुलभ प्रवासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून या वर्षात त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १८० कोटीची तरतूद केली आहे. ’