धुळे : पत्नीच्या त्रासाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार येथील चंपाबागेत घडला आहे. तुषार गटलू वाघ (३३) असे या युवकाचे नाव असून त्यांच्या भावाने वहिनीविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.तुषार यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १५ मार्चला सायंकाळी उघडकीस आली होती. तुषार यांची पत्नी महिनाभरापासून नाशिकला माहेरी गेली आहे. त्यांचे घर १३ मार्चपासून बंद होते. १५ मार्चला घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजारच्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर तुषार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. यासंदर्भात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती़ मात्र नंतर तुषार यांचा मालेगाव येथे राहणारा भाऊ सतीषने फिर्याद दाखल केली.त्यात तुषारची पत्नी मानसिक त्रास देत होती. त्याला कंटाळून तुषार यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. तुषार यांचे २०१४ मध्ये लग्न झाले होते. त्यांना ९ महिन्यांचा मुलगा आहे. तुषार यांच्या मोबाईलवरुन पत्नीशी एसएमएसद्वारे संभाषणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक एम. एस. सैय्यद यांनी दिली. (प्रतिनिधी)
पत्नीच्या जाचामुळे धुळ्यात एकाची आत्महत्या
By admin | Updated: March 24, 2016 01:38 IST