शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सर्किट बेंचचे एक पाऊल पुढ

By admin | Updated: April 3, 2015 01:07 IST

चंद्रकांत पाटील : प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची सहीे

कोल्हापूर : कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही झाली असून, लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. सर्किट बेंचच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली असून, हा प्रस्ताव कॅबिनेटपुढे नेण्यासाठी स्वत: पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे हाही प्रश्न मार्गी लागण्यास काहीच अडचण वाटत नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. सर्किट बेंच स्थापन करण्यासंबंधीच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी न्यायालयाने न्यायाधीश सोनक, हरदास व रणजित मोरे यांची त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. तो आल्यानंतर प्रत्यक्ष बेंच सुरू होण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू होऊ शकेल.मंत्री पाटील म्हणाले, टोलची दरवाढ करारानुसार झालेली आहे. पूर्वीच्या सरकारने जो करार केला होता, त्यानुसार दरवाढ झाली असून, जोपर्यंत टोल रद्द होत नाही तोपर्यंत कराराप्रमाणे ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. टोल रद्द करण्याचे वचन आम्ही कोल्हापूरच्या जनतेला दिलेले आहे. आम्ही त्याच्याशी बांधील असून, प्रकल्पाच्या मूल्यांकन समितीच्या खर्चाचा अहवाल आल्यानंतर गतीने हा प्रश्न मार्गी लावू. याबाबत आमदार चंद्रदीप नरके व आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात विषय ताणून धरला होता. यावर बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती गतीने काम करीत असून, थोड्याच दिवसांत मूल्यांकनाचा अहवाल प्राप्त होईल, असे सांगितले आहे. या अधिवेशनातच हा प्रश्न निकालात काढणार होतो; पण अधिवेशन येत्या चार-पाच दिवसांत संपणार असल्याने लवकरच हा प्रश्न सोडवू, हेच या प्रश्नाचे व्यावहारिक उत्तर होईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. यावेळी महेश जाधव, बाबा देसाई, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘आयआरबी’ला पैसे देण्याची योजना तयारकोल्हापूर टोलमुक्त करण्याची बांधीलकी आमची आहे. मूल्यांकन झाले की, ‘आयआरबी’ला कसे पैसे द्यायचे याचे नियोजन झाले असून, लवकरच हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.व्यस्त असल्यामुळेच..महापौर तृप्ती माळवी यांच्यावर कारवाईची मागणी आम्ही सुरुवातीलाच केली आहे. इतर कामांत व्यस्त असल्याने मुंबई येथे आलेल्या शिष्टमंडळासोबत जाऊ शकलो नसल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांना भेटताना पालकमंत्र्यांनी बाजू काढल्याची चर्चा झाली होती, त्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण केले.निर्णय न्याययंत्रणेवर बंधनकारकशासनाने हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर तो उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे पाठविला जातो. सरकारने या प्रस्तावास मंजुरी देणे हा यातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण सरकारने घेतलेला निर्णय न्याययंत्रणेवर बंधनकारक असतो. त्यामुळे सर्किट बेंच स्थापन होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडल्याचे स्पष्ट झाले.