शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

समर्थ पॅनलचा एकतर्फी विजय

By admin | Updated: April 28, 2016 01:42 IST

पुणे यांच्या ‘समर्थ पॅनल’ने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सत्तांतर घडवत एकतर्फी विजय मिळवला.

कोल्हापूर : कोल्हापूरच्या चित्रनगरीला ऊर्जितावस्था देण्याची ग्वाही देत, नवीन चेहरे घेऊन निवडणुकीत उतरलेल्या मेघराज राजेभोसले, पुणे यांच्या ‘समर्थ पॅनल’ने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सत्तांतर घडवत एकतर्फी विजय मिळवला. मंगळवारी १४ पैकी जाहीर झालेल्या १३ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या. माजी अध्यक्ष विजय कोंडके, प्रसाद सुर्वे, विद्यमान संचालक मिलिंद अष्टेकर यांचा धक्कादायक पराभव झाला. राम गणेश गडकरी सभागृहात मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील निकाल तब्बल बारा तासानंतर जाहीर झाला. त्यामध्ये अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांच्यासह विद्यमान संचालक मिलिंद अष्टेकर, अनिल निकम, बाळकृष्ण बारामती यांना पराभवाचा धक्का बसला. संथगतीने झालेल्या मतमोजणीबद्दल उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.मतमोजणीचा एकूण कल पाहता व राजेभोसले यांच्या उमेदवारांना मिळालेली मते पाहता त्यांच्या पॅनलने बहुमताकडे वाटचाल सुरु असल्याचे चित्र दिसत होते. महामंडळाच्या सन २०१६-२० या पंचवार्षिक निवडणुकीच्या १४ जागांसाठी क्रियाशील पॅनेल, शक्ती, समर्थ, कोंडके, फाळके, शाहू, संघर्ष, माय मराठी आणि परिवर्तन अशा नऊ पॅनल आणि अपक्षांसह १२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. महामंडळाच्या इतिहासात यावेळी पहिल्यांदाच सर्वाधिक पॅनेल आणि सर्वाधिक उमेदवारांनी निवडणूक लढविली. निवडणुकीत रविवारी (दि. २४) दोन हजार १३५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ५४.६४ टक्के मतदान झाले. कोल्हापूर, पुणे आणि मुंबई केंद्रांवरील मतपत्रिकांच्या एकत्रिकरणानंतर दुपारी बारा वाजता गटनिहाय चौदा टेबलांवर मतपत्रिकांची विभागणी करण्यात आली. दुपारी चार वाजता पहिल्या टप्प्यात रंगभूषा, ध्वनिरेखक, अभिनेत्री, निर्मिती व्यवस्था व व्यवस्थापकीय यंत्रणा, कामगार या पाच विभागांतील मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात झाली. रात्री साडेआठ वाजता संबंधित प्रक्रिया पूर्ण झाली. त्यांना विजय पाटकर यांच्या क्रियाशील पॅनलच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. या पाच विभागांत एकूण ६५९ मते बाद झाली. पहिल्या टप्प्यातील निकालात पाच जागांवर बाजी मारल्यानंतर समर्थ पॅनलच्या समर्थकांनी मेघराज राजेभोसले आणि विजयी उमेदवारांसह मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला. (प्रतिनिधी)