देवरूख (जि. रत्नागिरी) : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या डोक्यात बाटली मारू न तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर स्वत:च्याही गळ्यावर वार करून घेत हाताच्या नसा कापून घेतल्या. रोशन भीमदास कदम (२१, माखजन ता. संगमेश्वर) असे या माथेफिरूचे नाव आहे. संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे सोमवारी सकाळी १०.१५ वाजता ही खळबळजनक घटना घडली. रोशनवर रत्नागिरीत, तर मुलीवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही अल्पवयीन मुलगी माखजन येथे अकरावी विज्ञान शाखेत शिकत आहे. सोमवारी सकाळी ती महाविद्यालयाकडे जात असताना रोशनने तिला वाटेत अडवले आणि डोक्यात बाटली मारली. तसेच तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर रोशनने त्याच चाकूने स्वत:वरही वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलीने याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला, संगमेश्वर तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:44 IST