शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

३१ डिसेंबरला एक सेकंद एक्स्ट्रा सेलिब्रेशन

By admin | Updated: July 11, 2016 20:52 IST

२०१६ हे लीप वर्ष असल्याने यावर्षी ३६५ ऐवजी ३६६ दिवस आले आहेत

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11- २०१६ हे लीप वर्ष असल्याने यावर्षी ३६५ ऐवजी ३६६ दिवस आले आहेत. त्यातच यंदा ३१ डिसेंबर रोजी लीप सेकंद पालणार असल्याचे नुकतेच जाहीर झाल्याने २०१६ हे वर्ष एका सेकंदाने आणखी लांबणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, टायडल फोर्समुळे आणि इतर कारणांमुळे पृथ्वीचा स्वत: भोवती फिरण्याचा वेग मंदावत आहे. त्यामुळे अगदी अचूक वेळ दाखविणाऱ्या आधुनिक आण्विक घड्याळाची वेळ आणि प्रत्यक्ष पृथ्वीची स्थिती यामध्ये फरक पडू लागतो. हा फरक वाढला की मग आण्विक घड्याळाच्या वेळेत ३० जून किंवा ३१ डिसेंबर रोजी एक सेकंद वाढवून पृथ्वीची स्थिती आणि आण्विक घड्याळातील वेळ यात मेल घातला जातो. यालाच लीप सेकंद असे म्हणतात. ३१ डिसेंबर २०१६ रोजी लीप सेकंद धरण्यात येणार असल्याचे यू. एस. नेव्हल वेधशाळेचे डॉ. जेआॅफ चेस्टर यानी नुकतेच जाहीर केले. १९७२ पासून या वर्षांपर्यंत एकूण २७ वेळा लीप सेकंद पाळले गेल्याचेही सोमण यानी सांगितले. यापूर्वी ३० जून २०१५ रोजी लीप सेकंद धरण्यात आला होता.