शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्टपासून एक टक्का मुद्रांक शुल्क होणार कमी

By admin | Updated: March 5, 2017 23:44 IST

महागाईच्या काळात मालमत्ता खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. व्यवहारावरील एक टक्का मुद्रांक शुल्क कमी होणार आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 5  : महागाईच्या काळात मालमत्ता खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. व्यवहारावरील एक टक्का मुद्रांक शुल्क कमी होणार आहे. सध्या साडे सात टक्के मुद्रांक शुल्काची आकारणी करण्यात येते. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होणार असल्याने एक आॅगस्टपासून मुंबई महानगर पालिकेसाठी असलेला जकात आणि इतर महानगर पालिकेसाठी असलेला एलबीटी रद्द होईल. त्यामुळे एलबीटी लागू करताना लागू करण्यात आलेला एक टक्का मुद्रांक शुल्क रद्द करण्यात येणार आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

मंबई वगळता आॅगस्ट २०१३ पासून इतर महापालिकेतील जकात रद्द करून एलबीटी लागू करण्यात आले. एलबीटी लागू करताना एक टक्का अतिरिक्त मुद्रांक शुल्काची आकारणी सुरू करण्यात आली. त्यानंतर आॅगस्ट २०१६ पासून ५० कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीच्या कक्षेततून वगळण्यात आले. मात्र एक्क टक्का मुद्रांक शुल्क कायम ठेवण्यात आले.त्यानंतर मेट्रो रेल्वेच्या नावे एक टक्का अतिरिक्त मुद्रांक शुल्क लावण्याचा निर्णय शासनाने घेतला. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले, एक आॅगस्टपासून जीएसटी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईसाठी असलेला जकात आणि इतर महानगर पालिकांसाठी असलेला एलबीटीचा कर रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे एक टक्का मुद्रांक शुल्कही रद्द होईल.

जीएसटी लागू होताच १७ प्रकारचे कर रद्द होणार आहे. राज्याला विविध करांच्या माध्यमातून मिळणारी रक्कम ही केंद्र शासनाकडून मिळणार आहे. ती किती असेल आताच आता सांगता येणे अशक्य आहे. त्याचा अभ्यास सुरू आहे. तुटीची रक्कम ही शासनाकडून दोन महिन्यांनी मिळणार असून प्रत्येक वषार्ला यात १४ टक्क्यांची वाढ असणार आहे. निर्मात्या कंपन्यासोबत सेवांचा वापर होणार असल्याने राज्याला याचा अधिक लाभ होईल, असा दावाही त्यांनी केला.-महापालिकांना वार्षिक १४ टक्के वाढजीएएसटी लागू झाल्यावर राज्याला होणारी तुटीची रक्कम केंद्र शासन देणार आहे. वर्षाला यात १४ टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे महागनर पालिकांना देण्यात येणाऱ्या अनुदानातही वार्षिक १४ टक्के वाढ मिळणार असल्याचे वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. सध्या नागपूर महापालिकेला ४७ कोटी महिन्याला मिळत असून शासनाने वार्षिक ९९ टक्के वाढ देण्याचे जाहीर केले होते.