राजगुरुनगर : टाकळकरवाडी येथून जाणाऱ्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याजवळ दिगंबर कोहिनकर (वय -३८, रा. कोहिनकरवाडी, ता. खेड) यांचा अज्ञात इसमांनी दगडांनी ठेचून, आज खून केला.पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोहिनकर यांचा खून झाल्याची खबर पोलिसांना मिळाली. कालव्याजवळ असणाऱ्या पवार यांच्या तळईच्या शेतात कोहिनकर यांचा मृतदेह तोंड आणि डोके दगडाने ठेचलेल्या आणि पालथ्या अवस्थेत शेतमालकाला आढळून आले. त्याने तातडीने पोलिसांना कळविले. मृताच्या अंगावर निळी जीन्स, विजार आणि पांढरा सदरा होता. वाहन परवाना आणि मतदान ओळखपत्रामुळे मृतदेहाची ओळख पटली.पोलिसांनी अज्ञात आरोपींवर भा. दं. वि. कलम ३०२ नुसार खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस निरीक्षक गणेश मस्के यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
राजगुरुनगर परिसरात दगडांनी ठेचून एकाचा खून
By admin | Updated: May 21, 2016 01:34 IST