शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

भिवंडीत प्रॉपर्टी वादातून एकाचा खून ;सात जणांना अटक

By admin | Updated: April 18, 2017 22:07 IST

राहत्या घरासमोरील खोल्यांची जागा गाडीच्या पार्किंगसाठी देण्यास नकार दिल्याच्या रागातून शेजाऱ्याने संगनमताने

ऑनलाइन लोकमत
भिवंडी दि.18 - राहत्या घरासमोरील खोल्यांची जागा गाडीच्या पार्किंगसाठी देण्यास नकार दिल्याच्या रागातून शेजाऱ्याने संगनमताने जागा मालकाचे अपहरण करून त्यास जीवे ठार मारल्याची घटना काटेकरनगर येथे घडली आहे. बाळकृष्ण लक्ष्मण सोन्ने ( 26) असे ठार केलेल्या इसमाचे नाव आहे.
 
त्याच्या मालकीच्या काटेकरनगर येथे असलेल्या चार खोल्या त्याने विकत द्याव्यात असा तगादा शेजारी जितेंद्र चंद्रकांत टेकळे व त्याची पत्नी दक्षता टेकळे यांनी लावला होता. मात्र त्यास बाळकृष्ण याने नकार दिला होता.त्यावरून या दोन्ही कुटुंबात सहा महिन्यांपासून धुसफूसही सुरु होती.तर या रागातून दक्षता हिने चार महिन्यांपूर्वी बाळकृष्णवर विनयभंगाचा गुन्हाही दाखल केला होता.सर्व प्रयत्न करूनही बाळकृष्ण जागा देत नसल्याने त्याचा कायमचा काटा काढून त्याला संपवायचे असा कट रचून जितेंद्र व पत्नी दक्षता या दांपत्याने अन्य साथीदारांच्या मदतीने बाळकृष्ण कामावरून घरी परतत असताना त्यास मध्यरात्री गणेश मंदिरासमोर गाठले व धारदार शस्त्राने मारहाण करून त्यास जीवे ठार केले व खड्यात टाकून पळून गेले.
 
रात्री उशीर झाला तरी बाळकृष्ण घरी आला नसल्याने पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेतला असता त्याला  मैत्री डेव्हलपर्सचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी फेकून दिल्याचे दिसून आले.या खून  प्रकरणी नारपोली पोलिसांनी जितेंद्र टेकळे ,दक्षता टेकळे ,नितिन गायकवाड ,अभिजित टेकळे ,शुभम चव्हाण ,रोहित मधुकर पवार ,प्रविण अभिमन्यू बनसोडे सर्व रा.काटेकर नगर या सात जणांना गजाआड करून न्यायालयात हजर केले असता या सर्वांना 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.