शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

कुत्र्यास ठार केल्यावरून एकाचा खून : तिघांना अटक

By admin | Updated: May 25, 2016 23:50 IST

पाळलेल्या कुत्र्यास विषारी औषध खाऊ घातल्याच्या कारणावरून उद्भवलेला वाद विकोपास गेला आणि त्याचे पर्यवसान भांडणात झाले.

ऑनलाइन लोकमतकुही (नागपूर), दि. 25 - पाळलेल्या कुत्र्यास विषारी औषध खाऊ घातल्याच्या कारणावरून उद्भवलेला वाद विकोपास गेला आणि त्याचे पर्यवसान भांडणात झाले. याचा वचपा घेण्यासाठी तिघांनी घरी खाटेवर झोपलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करीत त्याला गंभीर जखमी केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना कुही तालुक्यातील वेलतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या डोंगरमौदा येथे मंगळवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. परमानंद विश्वनाथ सोमकुवर (४१, रा. डोंगरमौदा, ता. कुही) असे मृताचे तर संतन कार्तिक शेंडे (३२), भीमराव अभिमन्यू गोंडाने (५०) व हरी देवराव गोस्वामी (३९) तिघेही रा. डोंगरमौदा, ता. कुही अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. परमानंद सोमकुवर यांच्या पाळीव कुत्र्यास कुणीतरी विषारी पदार्थ खायला घातले. त्यामुळे कुत्र्याचा तडफडून मृत्यू झाला. परिणामी, परमानंद आणि भीमराव गोंडाने याची पत्नी यांच्यात भांडणही झाले.

स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून सदर भांडण मिटविले. दरम्यान, परमानंद हा नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री त्याच्या घरी खाटेवर झोपला होता. त्यात संतन, भीमराव व हरी हे तिघेही त्याच्या घरावर चालून आले. काही कळण्याच्या आत तिघांनी परमानंदवर गुप्ती व चाकून्े वार करायला सुरुवात केली. यात गंभीर जखमी झाल्याने परमानंदचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच वेलतूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या प्रकरणी वेलतूर पोलिसांनी अक्षय शिवाजी मेश्राम, रा. डोंगरमौदा याच्या तक्रारीवरून भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपीस अटक केली.