नवी मुंबई : नवीन मुंबई आणि पनवेल परिसरातील विकासातला महत्त्वाचा प्र्रकल्प असलेल्या नवी मुंबई विमानतळ उभारणीच्या मार्गातील प्रमुख अडथळा दूर झाला आहे. या प्रकल्पात केंद्र सरकारने ‘शेअर टील’ला मान्यता दिल्याने सिडकोला मोठा दिलासा मिळाला आहे. विमानसेवेव्यतिरिक्त इतर सेवांबाबत (शेअर टील) केंद्राकडून स्पष्टीकरण देण्यात आले. केंद्राच्या या स्पष्टीकरणामुळे विमानतळासाठी नवे गुंतवणूकदारही निविदा सादर करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला गती देण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्याशी चर्चा केली होती. या प्रकल्पाबाबत इच्छूक गुंतवणूकदारांनी सिडकोकडे विचारणा केली होती. त्यामुळे सिडकोने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे या प्रकरणी स्पष्टता मागितली होती. दिल्ली आणि मुंबई विमानतळाच्या धर्तीवर नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातही केंद्र सरकारने स्पष्ट केले असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी सांगितले. दरम्यान बोली लावणा-या गुंतवणूकदारांसाठी पात्रतेसाठीचे अर्ज सादर करण्यासाठी जानेवारीच्या तिस-या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे भाटिया यांनी सांगितले. यामुळे विमानतळाच्या निविदा आणखी स्पर्धात्मक होईल, असे ते म्हणाले.
नवी मुंबई विमानतळातील आणखी एक अडथळा दूर
By admin | Updated: December 8, 2014 02:44 IST