शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख सहकारी संस्था बंद करणार

By admin | Updated: June 30, 2015 02:46 IST

केवळ कागदोपत्री चाललेल्या राज्यातील सुमारे १ लाख सहकारी संस्था बंद करणार असल्याची माहिती सहकार व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे दिली.

सोलापूर : केवळ कागदोपत्री चाललेल्या राज्यातील सुमारे १ लाख सहकारी संस्था बंद करणार असल्याची माहिती सहकार व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे दिली. सोलापूर शहर व ग्रामीण भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राज्यातील सहकारी बँका व पतसंस्थांचे दोन हजार खटले प्रलंबित असून त्याचा निपटारा वेगाने करण्यात येत आहे, असे सांगून सहकारमंत्री म्हणाले, १ जुलै ते ३0 सप्टेंबर या कालावधीत राज्यातील २ लाख ३0 हजार सहकारी संस्थांची दप्तर तपासणी करण्यात येणार आहे. यातील १ लाख संस्था कागदोपत्रीच असल्याची प्राथमिक माहिती आहे. या मोहीमेत अशा संस्थांचे आॅडिट करून पिशवीबंद असलेल्या संस्था कायमच्या बंद करण्यात येतील.बाजार समितीच्या उत्पन्नापेक्षा वकिलांच्या फीचा खर्च जास्त असतो. त्यामुळे अशी प्रकरणे निकालात काढण्यासाठी पाच कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या बाजार समित्यावर ५ तर त्यापेक्षा कमी उलाढाल असलेल्या बाजार समितीवर दोन तज्ज्ञ संचालक नेमण्यात येतील. या संचालकांना म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला जाईल. तसेच कित्येक बाजार समित्यांचे चार वर्षात आॅडिट झालेले नाही. हा प्रश्न निकाली लावला जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.पत्रकार संरक्षण कायद्याबाबत सरकार गंभीरपत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा करण्याचा सरकार गंभीरपणे विचार करीत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडले जाईल, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.बुधवारपासून विशेष सर्वेक्षण मोहीमपुणे : राज्यातील तब्बल ४० टक्के संस्थांचे अस्तित्व केवळ कागदावरच असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे सर्व नोंदणीकृत सहकारी संस्थांची प्रत्यक्ष जाऊन तपासणी करण्यासाठी सहकार विभागाच्या वतीने १ जुलै ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात आली असल्याची माहिती सहकार आयुक्त चंद्रकात दळवी यांनी दिली.