शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड तालुक्यात नक्षलवाद्याकडून एका इसमाची हत्या

By admin | Updated: June 22, 2016 18:31 IST

भामरागड तालुक्यात टेकला गावात बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास एका इसमाची गळा कापून हत्या केल्याची घटना घडली.

ऑनलाइन लोकमतभामरागड (गडचिरोली), दि. 22 - अहेरी तालुक्यात रविवारी तीन नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीस दलाने कंठस्नान घातल्यानंतर नक्षलवाद्यांनी आपली दहशत कायम असल्याचे दाखविण्यासाठी भामरागड तालुक्यात टेकला गावात बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास एका इसमाची गळा कापून हत्या केल्याची घटना घडली. रामजी दसरू मट्टामी (३५) असे मृत इसमाचे नाव आहे.एक ते दीड महिन्यापूर्वी भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राचे पोलीस शिपाई बंडू वाचामी यांचे अपहरण करून नक्षलवाद्यांनी त्यांची क्रूरपणे हत्या केली होती व त्यांचा मृतदेह आरेवाडा गावाजवळ आणून टाकला होता. यात बंडू वाचामी यांच्या बहिणीचे पती असलेल्या रामजी दसरू मट्टामी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे.

पेरमिली दलमचे नक्षलवादी बुधवारी रात्री १ वाजताच्या सुमारास टेकडा गावात दाखल झाले. गावाच्या बाहेर असलेल्या रामजी मट्टामी यांचे घर त्यांनी गाठले व त्यांना झोपेतून उठवून गावाबाहेर आणले व त्यांची गळा कापून हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह गावाबाहेर टाकून देण्यात आला. त्यांच्या मृतदेहाजवळ नक्षलवाद्यांनी काही पत्रकेही टाकली, अशी माहिती मिळाली आहे.भामरागड पोलिसांनी त्यांचा मृतदेह व घटनास्थळावरची पत्रके ताब्यात घेतली असून या घटनेनंतर या परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या नेतृत्वात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. मृतक रामजी मट्टामी यांच्या पश्चात दोन पत्नी व तीन मुले आहेत.