शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून एक ठार; १७ जनावरे दगावली

By admin | Updated: June 6, 2016 02:22 IST

खामगाव, नांदुरा, शेगाव परिसरात वादळी वा-यासह पाऊस;घरांची पडझड, केळी पिकाचे नुकसान.

खामगाव : खामगाव, नांदुरा, शेगाव परिसरामध्ये रविवारी वादळी वार्‍यासह पाऊस झाला. गारडगाव येथील युवा शेतकरी ज्ञानेश्‍वर सुपडाजी वाडेकर यांचा वीज पडल्याने मृत्यू झाला. या घटनेत शेतकर्‍याचा एक बैलही ठार झाला आहे. दुसर्‍या घटनेत विहीगाव शिवारात वीज पडल्यामुळे बकर्‍यांसह १५ जनावरे दगावली. गोंधनापूर येथील शेतकरी रामकृष्ण सदाशिव खंडारे यांचा एक बैल वीज पडून जागीच ठार झाला आहे. वर्णा येथे दुपारी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे शेती पिकासह मालमत्तेचीही मोठी हानी झाली. विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे. तालुक्यातील गारडगाव येथील ज्ञानेश्‍वर सुपडाजी वाडेकर (२७) हे शेतातून जनावरे घेऊन जात असताना दुपारी २ वाजताचे सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामध्ये घरी रस्त्याने येत असताना ज्ञानेश्‍वर वाडेकर यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले, तर त्यांच्या शेजारी असलेला एक बैलही ठार झाला आहे. घटनेची माहिती मिळ ताच गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतक ज्ञानेश्‍वर वाडेकर यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ व पत्नी आहे. मागील दोन वर्षांंपूर्वीच ज्ञानेश्‍वरचे लग्न झाले होते. त्यांच्या अकाली निधनाने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. गोंधनापूर येथे बैल ठार वादळी वारा व विजांसह पाऊस झाला असताना तालुक्यातील गोंधनापूर येथील शेतकरी रामकृष्ण सदाशिव खंडारे यांचा एक बैल वीज पडून जागीच ठार झाला आहे. रामकृष्ण खंडारे यांची बैलजोडी गोठय़ाच्या बाजूला असलेल्या झाडाखाली बांधलेली होती. या झाडावर वीज पडल्याने यामधील एक बैल ठार झाला आहे. काही दिवसांवर खरिप हंगाम येऊन ठेपला असून, पेरणीचे दिवस अस ताना शेतकर्‍याचे बैल ठार झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुमारे ३0 ते ३५ हजार रुपये किमतीचे बैल असल्याची माहिती आहे.