शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात एक ठार

By admin | Updated: May 21, 2016 02:32 IST

पामबीच मार्गावर अपघातामध्ये पनवेलच्या बारमालकाच्या मृत्यूची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे.

नवी मुंबई : पामबीच मार्गावर अपघातामध्ये पनवेलच्या बारमालकाच्या मृत्यूची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. कोपरखैरणेत राहणाऱ्या बारबालांना सोडण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. यावेळी बारमालक व बारबाला तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते.सुधीर शेट्टी (३५) असे मयत बारमालकाचे नाव आहे. पनवेलमधील सुकापूर परिसरातील एस.बी. नाईट बार ते चालवत होते, असे समजते. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते दोन बारबालांना घेवून कोपरखैरणेला जात होते. पिंकी दास व खातुना बी. अशी दोघींची नावे आहेत. त्या एस.बी. नाईट बारमधील कामगार असून कोपरखैरणेला राहणाऱ्या आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्या कामानिमित्त थांबल्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शेट्टी स्वत: त्यांना मोटारसायकलने घरी सोडण्यासाठी चालले होते. या दरम्यान त्यांची होंडा ग्लॅमर मोटारसायकल (एमएच ४३ एई १०७९) पामबीच मार्गावर नेरुळ पोलीस ठाणे हद्दीत आली असता अपघात झाला. अपघातावेळी शेट्टी स्वत: मोटारसायकल चालवत होते, तर दोन्ही बारबाला मागे बसलेल्या होत्या. शेट्टी यांनी मर्यादेपेक्षा जास्त वेगात दुचाकी चालवल्यामुळे त्यांचा ताबा सुटला. त्यामध्ये मोटारसायकल रस्त्याच्या दुभाजकाला आदळून तिघेही गंभीर जखमी झाले होते. सदर अपघाताची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी शेट्टी यांना मृत घोषित केले, तर दोन्ही बारबालांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे वरिष्ठ निरीक्षक अधिकराव पोळ यांनी सांगितले. अपघातावेळी तिघेही मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे शेट्टी यांचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचेही पोळ यांनी सांगितले. त्यानुसार स्वत:च्या मृत्यूला जबाबदार व अपघाताला कारणीभूत ठरल्यामुळे मयत शेट्टी यांच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच शेट्टी यांच्या निधनाबद्दल हळहळ बार मालकांकडून व्यक्त होत आहे.एस. बी. नाईट बारवर यापूर्वी आॅक्टोबर २०१५ मध्ये पोलिसांनी छापा टाकून कारवाई केलेली आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या बारमध्ये अल्पवयीन मुलींचा वापर होत असल्याची तक्रार त्यावेळी एका समाजसेवी संघटनेने केलेली. तर पनवेल परिसरातील चर्चेतल्या बारपैकी एस.बी. नाईट हा एक बार असून बारबालांना घरी सोडण्यासाठी शेट्टी स्वत: मोटारसायकलने का गेले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.