शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीतील गॅस स्फोटात एक ठार, दोन जखमी

By admin | Updated: November 13, 2016 21:01 IST

घरगुती वापराच्या छोटया आकारातील गॅससिलिंडरचा स्फोट होऊन चिखली गावठाण येथे एकाचा होरपळून मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमतपिंपरी-चिंचवड, दि. 13 - घरगुती वापराच्या छोटया आकारातील गॅससिलिंडरचा स्फोट होऊन चिखली गावठाण येथे एकाचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. संत तुकारामनगरच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. भगवान दत्तात्रय इंगळे असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिखलीत भांड्यांच्या दुकानाच्या गोदामात गॅस सिलेंडरचा साठा आहे. तसेच त्या ठिकाणी घरगुती गॅस भरून देण्याचे काम केले जात होते. त्यावेळी छोट्या आकारातील पाच किलो वजनाच्या छोट्या आकारातील गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. या स्फोटात ज्या ठिकाणी गॅस सिलेंडर ठेवले होते, ते शेड उद्धवस्त झाले, शेजारी असलेल्या मिठाई विक्रीच्या दुकानाला आग लागली. त्यावेळी तेथे असलेले भगवान दत्तात्रय हिंगे (वय ४२,रा. चिंचवड) हे गॅस स्फोटात गंभीर जखमी झाले. तर मिठाईच्या दुकानाजवळ थांबलेले दोन जण जखमी झाले. त्यातील एकाचे नाव संतोष साने असे आहे. अन्य एका जखमीचे नाव समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाचे अधिकारी किरण गावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी परिसरातील गॅस टाक्या तातडीने अन्यत्र नेल्या. मिठाईच्या दुकानांवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. मृत्यूमुखी पडलेले इंगळे हे महापालिकेचे कर्मचारी असल्याचे समजते.