शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

सोलापूरमध्ये काँग्रेसच्या बैठकीत हाणामारी, एकजण जखमी

By admin | Updated: May 24, 2014 00:00 IST

माजी परिवहन समिती सभापती केशव इंगळे यांच्या डोक्यात खुर्ची घातल्याने ते जखमी झाले तर पोलिसालाही मारहाण करण्यात आली.

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवामुळे बोलाविलेल्या आत्मचिंतन बैठकीत काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी निवडणुकीतील अपयशाचे खापर एकमेकांवर फोडत गोंधळ घातला. माजी परिवहन समिती सभापती केशव इंगळे यांच्या डोक्यात खुर्ची घातल्याने ते जखमी झाले तर पोलिसालाही मारहाण करण्यात आली. शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीत दीड लाख मतांनी पराभव झाला. यामुळे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्यासह शहराध्यक्ष धर्मा भोसले यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविले होते. या पराभवाला पक्ष संघटनेतील गटबाजी कारणीभूत असल्यामुळे यावर चर्चा करण्यासाठी काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी ५.३0 वा. बैठक बोलावली होती. बैठक सुरू होण्याअगोदरच शहराध्यक्ष धर्मा भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारासमोर येणार्‍या अन्य कार्यकर्त्यांना दमदाटी केली. काही वेळ बैठक थांबली त्यानंतर पुन्हा ती चालू झाली़ यावेळी व्यासपीठावर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजन कामत, जनरल सेक्रेटरी केशव इंगळे, शहर उपाध्यक्ष अनिल मस्के, बजरंग जाधव, अशोक चव्हाण, अजय दासरी आदी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. सभा सुरू होताच सभेतील कार्यकर्त्यांनी उठून ही सभा कशासाठी बोलावण्यात आली आहे, असा जाब विचारला. त्यावर राजन कामत यांनी साहेबांच्या पराभवामुळे आत्मचिंतन करण्यासाठी बोलावल्याचे सांगितले, तेव्हा संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठाचे टेबल उचलून फेकून देण्यास सुरूवात केली. त्यानंतर तेथील खुर्च्याही फेकण्यात आल्या, फायबरच्या खुर्च्या तोडण्यात आल्या. हे होत असताना मोबाईलमध्ये चित्रीकरण करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यालाही खुर्ची फेकून मारहाण करण्यात आली. अचानक गोंधळ उडाल्याने बैठक उधळण्यात आली. दरम्यान काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी केशव इंगळे यांच्या डोक्यात खुर्ची घातल्याने ते जमिनीवर पडले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून गोंधळ घालणार्‍या कार्यकर्त्यांना अटक केली. त्यानंतर वातावरण शांत झाले. (प्रतिनिधी)..शिंदे साहेबांच्या पराभवाची कारणमिमासा करण्यासाठी आम्ही बैठक बोलावली होती. काही कार्यकर्त्यांनी आमच्यावरच आरोप करीत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. काहींनी माझ्या डोक्यात खुर्ची घातली. हा प्रकार निंदणीय आहे.-केशव इंगळे,माजी परिवहन समिती सभापती.