लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना गणवेश पुरविण्यात येणार आहे. महापालिका कर्मचारी महासंघाच्या मागणीनुसार, विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी १२ प्रकारचे कापड खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी एक कोटी रुपये खर्च होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकूण सात हजार ४६१ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये अ श्रेणीतील ८५ अधिकारी, ब श्रेणीतील २०८ अधिकारी कार्यरत आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांना गणवेश पुरविण्यात येतो. महापालिका मध्यवर्ती भांडार विभागाने २०१६-१७ या वर्षासाठी महापालिकेच्या गणवेश देय कर्मचाऱ्यांना गणवेश कापड खरेदीसाठी दर मागविले होते. पुण्यातील महालक्ष्मी ड्रेसेस अॅण्ड टेलरिंग फर्म यांनी दोन कोटी तीन लाख ८४ हजार रुपये असा लघुतम दर सादर केला. त्यानुसार महापालिकेच्या विविध विभागांसाठी गणवेश खरेदी करण्यात येणार आहे.कामाचे आदेशदोन कोटी तीन लाख ८४ हजार रुपये कामाचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गणवेश साहित्याच्या मिळालेल्या रकमेचे काम पूर्ण झाले आहे.
पालिका कर्मचाऱ्यांच्या गणवेशासाठी एक कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2017 00:44 IST