शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनासाठी एक कोटींचा निधी अशक्यच

By admin | Updated: January 16, 2017 03:18 IST

साहित्य संमेलनाला सध्या मिळणारा २५ लाखांचा सरकारी निधी वाढवून एक कोटी रुपये करण्याच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक आहे.

जान्हवी मोर्ये,

डोंबिवली- साहित्य संमेलनाला सध्या मिळणारा २५ लाखांचा सरकारी निधी वाढवून एक कोटी रुपये करण्याच्या मागणीबाबत सरकारकडून सकारात्मक विचार सुरू असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकमत’कडे दिली. मात्र, नोटाबंदी व निवडणूक आचारसंहितेमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या डोंबिवलीमधील साहित्य संमेलनास तावडे यांच्या घोषणेचा लागलीच लाभ होण्याची शक्यता दिसत नाही. अर्थात, संमेलनासाठी निधी कमी पडू देणार नाही, या तावडे यांच्या हमीवर आयोजकांची भिस्त राहणार आहे. ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून मिळणारा २५ लाखांचा निधी अपुरा असून तो वाढवून एक कोटी रुपये करण्याची मागणी आयोजक आगरी युथ फोरमने केली आहे. याबाबत, तावडे यांना विचारले असता निधी वाढवून एक कोटी रुपये करण्याच्या मागणीचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र, वाढीव निधी सरकारने दिला, तरी तो डोंबिवलीतील साहित्य संमेलनास नव्हे तर पुढील साहित्य संमेलनास मिळण्याची शक्यता आहे. संमेलनास गेल्या २० वर्षांपासून २५ लाखांचा निधी राज्य सरकारकडून दिला जात आहे. महागाई वाढल्याने निधी कमी पडत आहे. राज्याचा अर्थसंकल्प हजारो कोटी रुपयांचा आहे. ठाण्यात फेब्रुवारी २०१६ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पार पडले. या संमेलनासही राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांचाच निधी मिळाला. नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी हा निधी दुप्पट करून ५० लाख रुपये करण्याची मागणी केली होती. त्यामुळे साहित्य संमेलनास मिळणारा निधी १ कोटी रुपये करण्याची मागणी आहे. तावडे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड येथील संमेलनाच्या आयोजनात डी.वाय. पाटील यांचा पुढाकार होता. त्यांनी राज्य सरकारकडून मिळणारा निधी सरकारला देणगी स्वरूपात परत केला. ही चांगली बाब असली तरी निधीची रक्कम वाढवण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल. राज्य सरकारकडून संमेलनास काही कमी पडू दिले जाणार नाही. मात्र, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकारी उज्ज्वला मेहंदळे यांनी सांगितले की, सरकारने निधी वाढवून देण्याचा निर्णय घेतला तरी त्याची अंमलबजावणी डोंबिवलीतील संमेलनापासून होणार नाही. वाढीव निधी पुढील संमेलनाला मिळेल. >‘संमेलनात सहभागी शिक्षकांना भरपगारी रजा’संमेलनात मराठी भाषा शिकवणारे शिक्षक सहभागी होणार असल्याने राज्यातील मराठी शाळांना संमेलनाच्या तीन दिवसांच्या कालावधीत सुटी देण्याची मागणी स्वागताध्यक्ष वझे यांनी केली असल्याकडे मंत्री तावडे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, संमेलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांची सुटी ही भरपगारी असेल. राज्यभरातील जवळपास ५०० शिक्षक साहित्य संमेलनात सहभागी होणे अपेक्षित आहे.