शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्ट्यासह एकाला अटक

By admin | Updated: July 20, 2016 02:59 IST

गावठी कट्टा घेवून विक्रीसाठी आलेल्या एकाला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई : गावठी कट्टा घेवून विक्रीसाठी आलेल्या एकाला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री नेरुळ रेल्वे स्थानक आवारात पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. झडतीमध्ये त्याच्याकडे तीन गावठी कट्टे व एक काडतूस आढळून आले.कल्याणमधुन एक सराईत गुन्हेगार बेकायदेशीर शस्त्र घेवून नेरुळकडे येत असल्याची माहिती नेरुळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड, वासुदेव मोरे व इतर सहकाऱ्यांच्या पथकाने सोमवारी रात्री नेरुळ रेल्वे स्थानक आवारात सापळा रचला होता. यानुसार रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास स्थानकाबाहेरील रस्त्यावर एकांतामध्ये एक संशयित तरुण पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यांनी या तरुणाला अडवून त्याच्याकडील बॅगची झडती घेतली असता, त्यामध्ये तीन देशी बनावटीचे कट्टे व एक जिवंत काडतूस आढळून आले. यानुसार त्याला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश यादव (२०) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव असून तो त्याच्याकडील शस्त्र विक्रीसाठी नेरुळमध्ये आला होता. तो मूळचा आजमगडचा राहणारा आहे. कल्याण येथून रेल्वेने तो नेरुळमध्ये आला होता. त्याच्याकडील दोन कट्टे व काडतूस असा ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हे शस्त्र घेवून तो कोणाला विकण्यासाठी आला होता, याचा अधिक तपास नेरुळ पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)