शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवरील अत्याचार प्रकरणी एकास अटक

By admin | Updated: April 10, 2016 02:17 IST

आयेशानगर भागातील मदर आयेशा स्कूलमधील बालिकेवरील अत्याचार प्रकरणावरून शुक्रवारी झालेली दगडफेक, जाळपोळ, शासकीय वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी जमावाविरूद्ध

मालेगाव : आयेशानगर भागातील मदर आयेशा स्कूलमधील बालिकेवरील अत्याचार प्रकरणावरून शुक्रवारी झालेली दगडफेक, जाळपोळ, शासकीय वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी जमावाविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी या भागात तणावपूर्ण शांतता होती. रमजानपुरा व आयेशानगर भागातील परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास खातून डी. एड. कॉलेज परिसरात झालेल्या घटनेसंदर्भात रमजानपुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावीत यांनी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल केला. दिलशाद अहमद अश्रफअली (१६), जलील अहमद खालीद अख्तर (२५) व अल्ताफ अहमद मुश्ताक अहमद (२४) यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जमावाने दगडफेक करुन जखमी केले. (प्रतिनिधी)आरोपीला पकडले आयेशानगर भागातील मदर आयेशा स्कूलमधील ज्युनिअर केजीतील बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेतील सफाई कर्मचारी अजय दणके यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी अत्याचाराची घटना घडली. अत्याचार पीडित बालिकेच्या वडिलांनी शुक्रवारी रात्री फिर्याद दिली.