शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मुंबई-गोवा मार्गाचे चौपदरीकरण दीड वर्षात

By admin | Updated: June 6, 2017 06:25 IST

डिसेंबर २०१८पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करणारच, असा निर्धार केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पुढील टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन २३ जूनला करण्यात येणार असल्याची घोषणा करत डिसेंबर २०१८पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करणारच, असा निर्धार केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. दुर्घटनेनंतर केवळ १६५ दिवसांत काम पूर्ण केलेल्या नवीन सावित्री पुलाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. रायगड जिल्ह्यासह कोकणातील रस्ते विकासासाठी मंजूर केलेल्या ९९०० कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे कोकण विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करत भविष्यात कोकण विकासाचे श्रेय नितीन गडकरी यांनाच जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता, खासदार अमर साबळे, आमदार प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते. सावित्री पुलाच्या दुर्घटनेची जबाबदारी सरकारचीच आहे. कमकुवत पुलाच्या दुरुस्तीबाबत त्याच वेळी कार्यवाही होणे गरजेचे होते. त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली. भविष्यात अशा महत्त्वाच्या पुलांच्या दुरुस्तीबाबत आवश्यक ती कार्यवाही शासनाकडून केली जात असल्याचेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. पळस्पे ते इंदापूरपर्यंतच्या महामार्गाचे काम आघाडी सरकारच्या काळापासून रखडले होते. मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे कोकणवासीयांचा आत्मा आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या कामात भूसंपादनाच्या अडचणी निर्माण होत असल्याने कामाला विलंब होत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या ६०-६५ वर्षांत जितक्या किलोमीटरचे रस्ते बांधले गेले, त्यापेक्षाही अधिक किलोमीटर लांबीचे रस्ते गेल्या तीन वर्षांच्या काळात नितीन गडकरी यांच्या विभागाने पूर्णत्वास नेले आहेत. गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर विधानसभेत निवेदन करताना पावसाळ्यापूर्वी जूनपर्यंत पुलाचे काम पूर्ण करणार असल्याची घोषणा त्या वेळी नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार मी केली होती. त्याच्या प्रत्यक्ष वचनपूर्तीचे समाधान झाल्याचे सांगत, या दुर्घटनेत बळी पडलेल्या प्रवाशांना हीच खरी श्रद्धांजली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. संपूर्ण देशात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे श्रेय नितीन गडकरी यांनाच दिले पाहिजे, असे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सांगितले. पूर्वी कधीच दिला नव्हता इतका अधिक निधी नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विकासासाठी दिला. त्याबद्दल गीते यांनी दोघांना धन्यवाद दिले. सावित्री पुलाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्याचा उल्लेखही गडकरी यांनी या वेळी केला.सावित्री पुलाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी दुर्घटनेनंतर मदतकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांसह शासकीय अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार भरत गोगावले, आमदार अवधूत तटकरे, माजी आमदार माणिक जगताप, प्रधान सचिव आशिष कुमार, जि. प. अध्यक्षा अदिती तटकरे, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, कोकण आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी मलिकनेर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार आदी उपस्थित होते.>लोकप्रतिनिधींनी सरकारला सहकार्य करावेकोकणातील सुमारे ६६० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ९९०० कोटी रुपयांच्या तीन पॅकेजेसना सरकारने मंजुरी दिली आहे. कोकणाचे भाग्य बदलण्याची ताकद या महामार्गामध्ये असल्याने कामातील अडथळे दूर करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सरकारकडून येत्या तीन महिन्यांत महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.