शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
3
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
4
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
5
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
6
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
9
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
10
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
11
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
12
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
15
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
18
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
19
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
20
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

दीड वर्षीय विवानची हत्या गळा दाबून?

By admin | Updated: June 29, 2017 02:15 IST

मालाडमध्ये सोमवारी संध्याकाळी विवान कांडू या दीड वर्षीय मुलाचा मृतदेह गोणीत आढळला. त्याची हत्या गळा दाबून केल्याचा संशय पोलिसांना असून

मुंबई : मालाडमध्ये सोमवारी संध्याकाळी विवान कांडू या दीड वर्षीय मुलाचा मृतदेह गोणीत आढळला. त्याची हत्या गळा दाबून केल्याचा संशय पोलिसांना असून, आता अधिकृत वैद्यकीय अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे.विवानची हत्या कोणी आणि का केली असेल याची चौकशी पोलीस करत आहेत. विवानला गळा दाबून मारल्याचा प्राथमिक अंदाज तपास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताही अधिकृत अहवाल पोलिसांना मिळालेला नसून विवानचा व्हिसेरा प्रयोगशाळेत जतन करून ठेवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. विवानच्या मारेकऱ्यांचा शोध लवकरात लवकर घेण्याचा दबाव पोलिसांवर आहे. विवानचा काका आणि त्याच्या कुटुंबीयांची पोलीस चौकशी करत आहेत. मात्र हत्या करणारी व्यक्ती मृतदेह स्वत:च्या घराशेजारी ठेवणार नाही. त्यामुळे या प्रकरणी काकाचा हात असावा, असे प्राथमिकदृष्ट्या तरी वाटत नाही. मात्र तरीही त्याच्या चौकशीत विवानच्या हत्येशी संबंधित काही धागेदोरे सापडू शकतात, अशी शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे विवानचे आई-वडील मात्र पार ढासळून गेले आहेत. त्यांच्या शेजारीदेखील विवानच्या मृत्यूमुळे शोकाकुल वातावरण आहे.