शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी चिमुकल्यांच्या शाळेसाठी एक एकर शेती दान!

By admin | Updated: July 7, 2016 08:23 IST

लोकमत प्रेरणावाट : भूमी हक्क परिषदेचे के. जी. शाह यांचा निर्णय.

मोताळा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील माळेगाव वनग्राम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी भूमी हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष के. जी. शाह यांनी एक एकर जमीन दान देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. शाह यांच्या दातृत्वामुळे आदिवासी वस्तीतील चिमुकल्यांच्या शाळेसाठी हक्काची जागा मिळाली आहे. माळेगाव वनग्राम येथे आदिवासी वस्तीमधील प्राथमिक शाळेच्या मुलांना मागील ७ वर्षांपासून शाळेची इमारत नाही. या ठिकाणी इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंतचे २८ विद्यार्थी आहेत. त्यामुळे सोयी व सुविधांअभावी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परवड होत होती. ३0४ लोकसंख्या असलेल्या या आदिवासी वस्तीमध्ये सन २00७पर्यंत एक शिक्षकी वस्तीशाळा होती. सन २00८पासून वस्तीशाळेचे प्राथमिक शाळेमध्ये रूपांतर होऊन दोन शिक्षकी शाळा अस्तिवात आली. मात्र शाळेला स्वत:ची जागा नसल्याने हनुमान चावडीलगतच्या पडक्या जागेत शाळा भरत होती. मुलांची गैरसोय ध्यानी घेऊन वनहक्क दावेदार व भूमीहक्क परिषदेचे अध्यक्ष के. जी. शाह यांनी बुधवारी तहसीलदारसह गावकर्‍यांच्या उपस्थितीत एक एकर जमीन शाळेकरीता दान दिली.