शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

२१ गायकांचा एक सूर...आम्ही महाराष्ट्रीयन..! गाणे आता यूट्युबवर

By admin | Updated: April 12, 2016 12:32 IST

‘महाराष्ट्रीयन... आम्ही महाराष्ट्रीयन...’ असे म्हणणारे हे गीत राज्यासह देशातल्या ख्यातनाम अशा २१ गायकांनी गायले असून, ते आता यूट्युबवर रसिकांना उपल्बध झाले आहे.

मुंबई :धाव जरी पोटासाठी, डोळ्यात स्वप्ने मोठी... मुलखात कित्येकांना आहे दिला आसरा...गर्दी ही इथली न्यारी,दिसे आईना बिलोरीप्रतिरूप भासे भारताचेहसरे रुपेरी...अशा आश्वासक शब्दरचनेसह महाराष्ट्राचे नवे गीत आकाराला आले आहे. ‘महाराष्ट्रीयन... आम्ही महाराष्ट्रीयन...’ असे म्हणणारे हे गीत राज्यासह देशातल्या ख्यातनाम अशा २१ गायकांनी गायले असून, ते आता यूट्युबवर रसिकांना उपल्बध झाले आहे.चार मिनिटांचे हे सुरेख गाणे अरुण म्हात्रे या नामवंत कवीने लिहिले असून, परीक्षित भातखंडे यांनी त्याला संगीताचा साज चढवला आहे. सुरेश वाडकर, शंकर महादेवन, रूपकुमार राठोड, जावेद अली, सुनाली राठोड, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, महालक्ष्मी अय्यर, अजित परब यांच्यासह मंगेश बोरगावकर, कीर्ती किल्लेदार, श्रीरंग भावे, धवल चांदवडकर, स्वप्निल गोडबोले, सावनी रवींद्र, सायली पंकज, आनंदी जोशी आणि रीवा राठोड या नव्या दमाच्या गायकांनी ‘आम्ही महाराष्ट्रीयन.. आम्ही महाराष्ट्रीयन...’चा ठेका धरला आहे.

या गाण्याची चित्रफीत मराठीतील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी दिग्दर्शित केली असून, सगळ्या गायकांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील विविध कला, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडविणारी सुंदर छायाचित्रे पाहायला मिळणार आहेत. ज्यांची जन्मभूमीच महाराष्ट्र आहे असे नव्हे, तर ज्यांची कर्मभूमीदेखील महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्रीयन असा विचार मांडणाऱ्या या गाण्याची निर्मिती लोकमत वृत्तपत्र समूहाने केली आहे. या गाण्याचा एक मिनिटाचा भाग संजय गायकवाड आणि नरेंद्र हेटे यांच्या यूएफओ कंपनीच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व चित्रपटगृहांत दाखविण्यात येणार आहे.