शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ओमी टीमचा भाजपाला ऐनवेळी धोबीपछाड?

By admin | Updated: April 3, 2017 04:13 IST

महापौरपदाचे आश्वासन देऊन नंतर ते फिरवल्याने भाजपा आणि ओमी कलानी टीममध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाने वेगळे वळण घेतले

उल्हासनगर : आधी महापौरपदाचे आश्वासन देऊन नंतर ते फिरवल्याने भाजपा आणि ओमी कलानी टीममध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाने वेगळे वळण घेतले असून त्याचे पडसाद बुधवारच्या महापौरपदाच्या निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत. पंचम यांच्यासह ओमी टीमच्या नाराज २१ नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा देण्याचे ठरवल्याने भाजपाची स्थिती कमकुवत बनली आहे. शिवसेनेने या असंतुष्टांभोवती गळ टाकल्याने हातातोंडाशी आणलेली सत्ता जाते की काय भीतीने भाजपा नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.ओमी यांना निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द फिरवून मीना आयलानी यांना महापौरपदाची संधी दिल्याने भाजपातील एक गट बिथरला आहे. त्यामुळे पंचम यांच्यासह ओमी गटाचे नगरसेवक महापौर निवडणुकीच्या तोंडावर सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. याबाबत ओमी कालानी व मनोज लासी यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. भाजपाच्या ३३ नगरसेवकांपैकी २१ नगरसेवक आमच्या गटाचे असल्याचा दावा ओमी सुरूवातीपासून करत आहेत. भाजपाने साई पक्षाला सोबत घेतले. पण त्या पक्षालाही फुटीचे ग्रहण लागले असून त्यांच्या ११ नगरसेवकांपैकी सहा जण फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा शिवसेना नेते करत आहेत. साई गटाची मान्यता रद्द झाल्याने त्यांना कोणताही व्हिप लागू होणार नाही. आधीच त्यांच्यातील फूट आणि ओमी गटाची ओढवून घेतलेली नाराजी यामुळे निष्ठावंत म्हणून पाठ थोपटून घेणाऱ्या भाजपा नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. (प्रतिनिधी)