शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील वृद्ध देशात सर्वाधिक असुरक्षित

By admin | Updated: August 19, 2015 01:36 IST

महाराष्ट्रात वृद्ध नागरिक सर्वाधिक असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे

जयेश शिरसाट, मुंबईमहाराष्ट्रात वृद्ध नागरिक सर्वाधिक असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अल्पवयीन मुली, महिलांचा विनयभंग, छेडछाडीतही महाराष्ट्र अव्वल असल्याचा निष्कर्षही समोर आला आहे. एनसीआरबीने २०१४ मध्ये देशभरात घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार एकूण गुन्हेगारीत मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांपेक्षा महाराष्ट्रात पिछाडीवर असला तरी वृद्ध आणि महिलांविरोधी अत्याचारात महाराष्ट्र पुढे आहे.संपूर्ण राज्यात वृद्धांवरील अत्याचाराचे एकूण १८७१४ गुन्हे दाखल झाले. त्यात १९००८ वृद्ध पीडित आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ३९४८ गुन्हे एकट्या महाराष्ट्रात दाखल आहेत. त्याखालोखाल मध्यप्रदेश (३४३८), तामिळनाडू(२१२१), राजस्थान(१०३४) अशी राज्ये आहेत. आकडेवारीतली सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे ज्येष्ठांवरील सर्वाधिक बलात्कार महाराष्ट्रात घडलेत. वृद्धांचे घर लक्ष्य करत दरोडे घालण्यातही महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. असे २४ दरोडे राज्यात पडलेत. तर संपूर्ण देशात ही संख्या ४० आहे. महिलांविरोधी अत्याचाराचे एकूण ३ लाख ३७ हजार ९२२ गुन्हे दाखल झाले. त्यात ३ लाख ४१ हजार महिला पीडित ठरल्या. महिलांविरोधी एकूण गुन्हेगारीत महाराष्ट्र पाचव्या स्थानी आहे.