शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाच्या दशक्रिया विधीसाठी तरुणाईने जमा केली लोकवर्गणी

By admin | Updated: January 3, 2017 22:13 IST

मुलगा नसलेल्या वृद्धाचा तरुण मंडळींनी एकत्र येत २० हजार रुपये लोकवर्गणी जमा करून त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम केला.

रवींद्र सूर्यवंशी/  ऑनलाइन लोकमत जैताणे (धुळे), दि. 3 -  जिवंतपणी अत्यंत काबाडकष्ट करून पदरी पडलेले अठराविश्व दारिद्य्राशी संघर्ष करणाऱ्या नामदेव भगवान माळी या वृद्धाचे २८ डिसेंबरला निधन झाले. त्यांना मुलगा नसल्याने त्यांचा अंत्यविधीसाठी साक्री तालुक्यातील तरुण मंडळींनी एकत्र येत २० हजार रुपये लोकवर्गणी जमा करून त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम केला. शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ येथील त्यांच्या भाऊबंदकीतील एका मुलाच्या हस्ते त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडला. नामदेव माळी यांच्या निधनानंतर त्यांच्या घरात पैशाची एकही दमडीही नव्हती. त्यामुळे त्यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम त्यांच्या दशक्रिया विधीचा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा जैताणे येथील चावडी चौक मित्र मंडळ, शिवाजी व्यायाम शाळा मित्र मंडळ व सरपंच संजय खैरनार, मोहन गायकवाड, धंजी जाधव, बापू बोरसे, गोकूळ पाटील यांनी परिसरातून वर्गणी गोळा करून केली. नामदेव माळी हे मूळचे दाऊळ येथील होते. मात्र, गेल्या २८ वर्षांपासून जैताणे येथे ते राहत होते. शरीरात शक्ती असे पर्यंत ते व त्यांची पत्नी गंगाबाई काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करीत होते. परंतु, त्यांचे हातपाय थकल्यानंतर नामदेव माळी हे जैताणे येथील संत सावता मंदिर येथे सेवेकरी म्हणून काम करीत होते. पहाटे ४ वाजेपासून ते देवाच्या आराधनेत तल्लीन असायचे. त्यांच्या पत्नीला कॅन्सर या दुर्धर रोगाने ग्रासले होते. त्यांनाही चालता येत नव्हते. ही मोठी अडचण त्यांच्यासमोर असताना अचानक त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाची हेळसांड होऊ नये, म्हणून संवेदनशील युवकांनी लोकवर्गणीतून त्यांचा अंत्यविधी केला.