शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पॅकिंगच्या वस्तू ३० सप्टेंबरपर्यंत विका

By admin | Updated: July 10, 2017 02:27 IST

देशात वस्तू व सेवा कर लागू झाल्याने जुलै महिन्यानंतर काही आवेष्टित (पॅकिंग) वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशात वस्तू व सेवा कर लागू झाल्याने जुलै महिन्यानंतर काही आवेष्टित (पॅकिंग) वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. तसे असेल तर उत्पादकांना नव्या वाढीव किमतीचे स्टीकर किंवा स्टॅपिंग किंवा आॅनलाइन छपाई केलेले उत्पादन केवळ ३० सप्टेंबर २०१७ पर्यंतच विक्री करता येणार आहेत. शिवाय १ जुलै किंवा त्यानंतरच्या वस्तूवर अतिरिक्त स्टीकर लावता येणार नसल्याचे वैध मापन शास्त्र यंत्रणेने स्पष्ट केले आहे.केंद्र शासनाने केवळ जुलै महिन्यापूर्वी शिल्लक असलेल्या किंवा विक्री न झालेल्या वस्तूंना ही सूट दिली असल्याचे वैध मापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. गुप्ता म्हणाले की, जुलै महिन्यापूर्वी विक्रीस आलेल्या वस्तूंवर अतिरिक्त स्टीकर लावण्याची परवानगी शासनाने दिली आहे. मात्र ती केवळ ३० सप्टेंबरपर्यंतच मर्यादित आहे. त्यातही विक्रेत्यांना दोन्ही एमआरपी स्पष्ट दिसतील, अशा प्रकारे छापायच्या आहेत. जेणेकरून जितका टक्के कर लागला आहे, तितकीच किंमत वाढली आहे का? याची तपासणी ग्राहकाला करता येईल. शिवाय सुधारित किमतीइतकीच देयकाची रक्कम (बिल) असावी. त्याहून अधिक रक्कम आकारणाऱ्या उत्पादक किंवा विक्रेत्याविरोधात ग्राहकांना तक्रार करता येणार आहे....तर येथे करा तक्रारकोणत्याही उत्पादनावर उत्पादित महिना जुलै किंवा त्यानंतरचा असेल, तर त्यावर दोन एमआरपी असता कामा नये. कारण केंद्र शासनाने दिलेली सूट ही फक्त जुलै महिन्याआधी शिल्लक वस्तूंवर आहे. त्यामुळे ग्राहकांनी वस्तू घेताना त्यावर आकारलेला कर आणि आधीची रक्कम याची बेरीज करून सुधारित रक्कम तपासावी. जर विक्रेता किंवा उत्पादकाकडून फसवणूक होत असेल, तर वैध मापन शास्त्र कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाकडे ०२२-२२६२२०२२ या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.