शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

‘सवाई’मध्ये जुन्या-नव्याचा सुरेल संगम

By admin | Updated: November 29, 2014 01:31 IST

नव्या पिढीच्या नऊ कलाविष्कारांचा सुरेल संगम यंदाच्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

पुणो : संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, गायक पं. जसराज, पं. उल्हास कशाळकर, गायिका मालिनी राजूरकर यांसारख्या संगीतातील दिग्गजांसह सुंद्री वादक भीमण्णा जाधव, श्रीवाणी जडे, सानिया पाटणकर, धनंजय देगडे, अंबी सुब्रमण्यम आदी नव्या पिढीच्या नऊ कलाविष्कारांचा सुरेल संगम यंदाच्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.  महोत्सवात प्रथमच सादर होणारी सुरेश वाडकर यांची अभिजात संगीताची मैफल हे यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची (दि. 11) सुरुवात सोलापूरचे नावाजलेले सुंद्रीवादक सूरमणी भीमण्णा जाधव यांच्या वादनाने होणार आहे. त्यानंतर जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शिष्या सानिया पाटणकर यांचे गायन आणि बनारस घराण्याचे ज्येष्ठ गायक राजन-साजन मिश्र यांचे शिष्य दिवाकर-प्रभाकर कश्यप या बंधूंचे सहगायन रसिकांना ऐकता येणार आहे. पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाच्या जादुई सुरांनी 
पहिल्या दिवसाची सांगता होणार आहे. 
रमाकांत गायकवाड या युवा कलाकाराच्या गायनाने दुस:या दिवशी (दि. 12)चा प्रारंभ होणार असून, दिल्लीच्या किराणा घराण्याच्या गायिका सुमित्र गुहा यांचे तसेच पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांचे गायन त्यानंतर सादर होईल. प्रख्यात भरतनाटय़म नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांचा नृत्याविष्कारही रसिकांना अनुभवायला मिळणार असून, पतियाळा घराण्याचे गायक पं. अजय पोहनकर यांच्या गायनाने 
दुस:या दिवशीचा समारोप होणार आहे. (प्रतिनिधी)
 
महोत्सवाचे वेळापत्रक आणि कलाकारांची नावे शुक्रवारी मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी जाहीर केली. 
 
25हून अधिक कलाकारांचा सहभाग! 
नव्या आणि ज्येष्ठ कलाकारांच्या सुरेल संगमातून या वर्षीचा 62वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे 11 ते 14 डिसेंबरदरम्यान न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे रंगणार आहे. महोत्सवात तब्बल 25 कलाविष्कार आणि 25हून अधिक नामवंत आणि युवा कलाकार सहभागी होणार आहेत.