शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

छत्र्यांमध्ये जुनीच फॅशन नव्याने

By admin | Updated: June 9, 2016 03:43 IST

आठवडाभरात पाऊस डेरेदाखल होणार असल्याचे शुभवर्तमान आले आणि छत्र्यांच्या बाजारांतील लगबग सुरू झाली.

आठवडाभरात पाऊस डेरेदाखल होणार असल्याचे शुभवर्तमान आले आणि छत्र्यांच्या बाजारांतील लगबग सुरू झाली. नेहमीच्या पारंपरिक छत्र्यांबरोबरच नाजूक-एखादाच सिझन कसाबसा पूर्ण करणाऱ्या चायना मेड छत्र्यांनी दुकाने रंगीबेरंगी बनली आहेत. नवीन पॅटर्न, आकर्षक रंगसंगतीमुळे छत्र्यांचा बाजार बहुरंगी होत असतानाच जुनीच फॅशन नव्याने येत असल्याचे बाजारात फेरफटका मारल्यावर दिसून येते.>गेल्या आठवड्यापासूनच छत्र्यांच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. पावसाळ्याची चाहूल लागल्याने आता खरेदीला वेग येईल. महिला मात्र मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत आहेत. यंदा छत्र्यांमध्ये नवीन प्रकार आले आहेत. नव्या फॅशनच्या छत्र्या महाविद्यालयीन तरुणतरुणींच्या पसंतीस उतरत आहेत. छत्र्यांमध्ये आता जुनी फॅशन नव्याने येऊ लागली आहे. - नरेंद्र सुराणा, विक्रेतेतरुणांसाठी पायपिंग डिझाइनपायपिंग डिझाइनच्या आकर्षक छत्र्या महाविद्यालयीन तरुणांसाठी आल्या आहेत. या छत्र्या थ्री फोल्ड असल्याने त्या सॅकमध्ये बाळगणेही सोपे आहे. यात निळा, नारिंगी, हिरवा आणि जांभळा असे चार रंग असून या छत्र्यांची किंमत ३००, ४०० आणि ४५० रु. आहे. पियानो छत्री या प्रकारात १६ काड्यांची रेन्बो छत्री असून त्याची किंमत ३५० रुपये आहे. ही छत्री उघडल्यावर रेन्बोचा वेगळाच फिल येतो. आयफेल टॉवर, निआॅन कलर : छोटछोट्या फुलांच्या प्रिंट असलेल्या थ्री फोल्ड छत्र्या महिलावर्गासाठी असून यात निआॅन कलर अधिक आहेत. याची किंमत ३०० रुपयांपासून पुढे आहे. महिलांसाठी आयफेल टॉवरची प्रिंट असलेली छत्रीही असून तिची किंमत ४०० रु. आहे. पुरुषांसाठी टू फोल्ड आणि थ्री फोल्ड छत्र्याही आहेत. तसेच यात सुपर जम्बो छत्री आली आहे. मोठ्या आकाराची ही छत्री साधारण ५००-५५० रु. च्या घरात आहे. कोरिओ प्रिंट छत्रीमहिलांसाठी नेहमीच्या छत्र्यांपेक्षा यंदा नवीन प्रकारची छत्री पाहायला मिळत आहे, ती म्हणजे कोरिओ प्रिंटची छत्री. यात निआॅन कलर असून पाच ते सहा रंग यात पाहायला मिळतात. या छत्रीची किंमत ४५० रुपयांदरम्यान आहे.फुल्ली आॅटोमेटिक छत्रीबटणने छत्री उघडता येते. परंतु, ती बंद करताना थोडे कष्ट घ्यावे लागत. परंतु, आता ती बटणाच्या साहाय्याने बंदही करता येईल, अशा प्रकारच्या विविध छत्र्या बाजारांत आल्या आहेत. अशा छत्र्या ६०० रुपयांपासून पुढे आहेत. फुल्ली आॅटोमेटिक कार छत्री छत्रीचा आकार उघडला तरी गोल असतो आणि बंद केला तरी निमुळता असतो. परंतु, यंदा नव्याने दाखल झालेली फुल्ली आॅटोमेटिक कार छत्री ही उघडल्यावर आकाराने गोल दिसते आणि बंद केल्यावर तिची एक बाजू चपटी होते. ही आगळ्यावेगळ्या आकाराची आणि प्रकाराची छत्री ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या छत्रीचे वैशिष्ट्य म्हणजे घरात ही छत्री कोठे एका जागी ठेवण्यापेक्षा ती भिंतीलाच चिकटवून ठेवता येऊ शकते. ही सध्या तरी फक्त काळ्या रंगातच उपलब्ध आहे. विशेषत: कारने प्रवास करणाऱ्यांसाठी ही छत्री खासकरून बनवल्याचे विक्रेते नरेंद्र सुराणा सांगतात. ज्येष्ठांसाठी वॉक स्टिकलांबलचक आणि टोकाला निमुळती होत जाणारी गोल्फ छत्री ज्येष्ठांसाठी असून याच प्रकारात त्यांच्यासाठी विशेष आणि आकर्षक अशी वॉक स्टिक छत्री पाहायला मिळते आहे. वॉक स्टिक छत्रीत फुटबॉल क्लबची प्रिंट असून तिची किंमत ४०० रुपये आहे. फाइव्ह फोल्ड छत्रीटू फोल्ड, थ्री फोल्ड छत्रीनंतर आता थेट फाइव्ह फोल्ड छत्री बाजारात आली आहे. तिची किंमत ३५० रुपये आहे. या छत्रीचा आकार अगदी लहान होत असल्याने बॅगेत ठेवण्यास सहज आणि सोपी आहे. दरवर्षी मिळणाऱ्या थ्री फोल्ड, टू फोल्ड छत्र्यांबरोबर ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या नव्या आकारांच्या, नाना प्रकारांच्या छत्र्या बाजारात आल्या आहेत. प्रत्येक वयोगटासाठी त्यांची पसंती जपणाऱ्या छत्र्या झळकू लागल्या असून कोरिओ प्रिंटची छत्री, फुल्ली आॅटोमेटिक कार छत्री, फाइव्ह फोल्ड छत्री, ज्येष्ठांसाठी वॉक स्टीक छत्री असे विविध प्रकार यंदा पाहायला मिळत आहेत. कॉलेज तरुणतरुणींसाठी फॅशनसोबतच इतरांचे लक्ष वेधून घेणाऱ्या दिलखेचक छत्र्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.डोरेमॉन, सिण्ड्रेला, स्पायडरमॅन लहान मुलांचे आकर्षण असलेल्या कानवाल्या छत्र्यांमध्ये यंदाही वेगवेगळ्या टवटवीत प्रिंट आढळतात. अर्धे कापड आणि अर्धे प्लास्टिक अशा प्रकारामध्ये लहान मुलींसाठी छत्र्या आल्या आहेत. ही छत्री गुलाबी रंगात असल्याने मुलींना ती जास्त आकर्षित करते. भीम, डोरेमॉन, प्रिन्सेस, बार्बी डॉल, सिण्ड्रेला, बेन टेन, स्पायडरमॅन यासारख्या कार्टुनच्या छत्र्याही बाजारांत आहेत. यंदा लहान मुलांच्या छत्र्या कॉफी कलरमध्ये पाहायला मिळत आहेत. लहान मुलांच्या छत्र्यांची किंमत ७० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत आहे.फ्रिल आणि फ्लोरोसन्सचा पॅटर्नेसूर्यफुल आणि गुलाब या फुलांच्या मोठ्या आकारांच्या प्रिंट्स असलेल्या फुलांच्या छत्र्या यंदा कॉलेज तरुणींसाठी इन थिंग ठरतील, असा विक्रेत्यांना विश्वास वाटतो. पियानो फ्लॉवर अम्ब्रेला असा या छत्रीचा प्रकार आहे. यात ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट या रंगसंगतीची छत्रीही नजरेत भरते. या छत्र्यांची किंमत २५० ते ४०० रुपये आहे. फ्रिलच्या छत्र्यांमध्येही १२ रंग पाहायला मिळतात. फ्लोरोसन्स रंगांच्या छत्र्याही या प्रकारात असून त्यांची किंमत ३५० ते ४०० रुपये आहे.