शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

मुंबईतील जुन्या इमारतींचे आॅडिट करणार

By admin | Updated: May 12, 2015 01:50 IST

काळबादेवी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वच जुन्या इमारतींचे आॅडिट केले जाईल, असे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सांगितले.

नवी मुंबई : काळबादेवी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वच जुन्या इमारतींचे आॅडिट केले जाईल, असे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सांगितले. या दुर्घटनेत जखमी असलेल्या दोन अग्निशमन अधिकाऱ्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ते ऐरोली येथे आले होते. या जखमींच्या उपचारात कसलीही कमतरता राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.शनिवारी काळबादेवी येथील गोकुळ निवास या इमारतीमधे आग लागलेली. यावेळी मुंबई अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे काम करत असतानाच इमारत कोसळलेली. त्यामध्ये संजय राणे, महेंद्र देसाई या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला तर सुनील नेसरीकर व सुधीर अमीन हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ऐरोलीच्या बर्न सेंटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सोमवारी जवानांची भेट घेतली. दुर्घटनेत सुधीर हे ९० टक्के तर सुनील हे ५० टक्के भाजले आहेत. दोघांवरही शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशी दुर्घटना घडल्यास खबरदारीची उपाययोजना राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याकरिता जिथे मदत पोहचवता येणार नाही अशा दाटीवाटीच्या ठिकाणी मॉकड्रील घेऊन तिथल्या जुन्या इमारतींचे आॅडिट केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. तर दोन्ही जखमी अधिकाऱ्यांच्या उपचारात कसलीही कमतरता राहू देणार नसल्याचेही पाटील यांनी सांगितले.बंदोबस्तावरील पोलिसांचे हालदुपारी १२ वाजता मुख्यमंत्री किंवा गृहराज्यमंत्री येणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती. सकाळी ११पासून चोख बंदोबस्त होता. परंतु आगमनाची वेळ माहीत नसल्याने त्यांना पाच तास घाम गाळावा लागला. (प्रतिनिधी)