शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कडब्यासोबत कापल्या ५०० च्या जुन्या नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2017 21:31 IST

तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे कडबा सोबत ५०० च्या जुन्या नोटांंचे तुकडे कापले गेल्याचा प्रकार समोर आला आहे़ या नोटा कडब्यात कोणी टाकल्या

 ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 14 -  तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे कडबा सोबत ५०० च्या जुन्या नोटांंचे तुकडे कापले गेल्याचा प्रकार समोर आला आहे़. या नोटा कडब्यात कोणी टाकल्या हे मात्र अद्याप समोर आलेले नाही़. चिनोदा येथील शेतकरी पोपट संतोष पाटील यांच्या खळ्यात मंगळवारी सकाळी साठवलेल्या कडब्याची कटाई करण्यासाठी मशिन सुरू करण्यात आले़. चाऱ्याची कटाई सुरू असतानाच मजुरांना अचानक ५०० च्या जुन्या नोटांचे तुकडे दिसून आले. मजुरांनी ही माहिती शेतकरी पोपट पाटील यांना दिली़. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, ५०० च्या जुन्या नोटांचे असंख्य तुकडे चाऱ्यात मिसळल्याचे दिसून आले. ही माहिती गावात पसरल्यानंतर ग्रामस्थांनी खळ्याकडे धाव घेतली़ मात्र तोवर मजुरांनी नोटांचे तुकडे उचलून नेले होते. चाऱ्यासोबत कटाई झालेल्या नोटा साधारण ५० हजार रूपये मूल्याच्या असल्याची माहिती आहे. कटाई झालेल्या नोटा नेमक्या कोणाच्या, कोणी लपवल्या याबाबतच्या चर्चांना गावात ऊत आला आहे. (वार्ताहर)चाऱ्याची आवश्यकता भासत असल्याने ज्वारीचा कडबा खरेदी केला होता़ या कडब्याची कटाई कटर मशीनद्वारे करण्यात येत असतानाच मजुरांना कडब्याच्याच्या एका गड्डीतून नोटांचे तुकडे येत असल्याचे दिसून आले होते. -पोपट संतोष पाटील, शेतकरी,