शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ओला, उबेरच्या मनमानीला लावणार चाप- दिवाकर रावते

By admin | Updated: June 22, 2016 20:26 IST

ओला, उबेर सारख्या टॅक्सींच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन धोरण अंमलात आणणार आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 22 -  ओला, उबेर सारख्या टॅक्सींच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन धोरण अंमलात आणणार आहे. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून सेवा देणा-या टॅक्सी कंपन्यांसाठी परिवहन विभागाने धोरण तयार केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर धोरण लागू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी दिली. नव्या धोरणामुळे ओला, उबेर आदी कंपन्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे.परिवहन विभागाच्यावतीने राबविल्या जाणा-या विविध योजनांची माहिती देण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना रावते म्हणाले की, अ‍ॅपच्या माध्यमातून सेवा पुरवणा-या ओला, उबर आदी कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारणी होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या कंपन्यांच्या टॅक्सींनादेखिल सामान्य टॅक्सीप्रमाणे मीटर लावणे बंधनकारक करण्यात येईल. त्यामुळे या कंपन्यांच्या माध्यमातून धावणा-या टॅक्सींच्या दरात सुसूत्रता येईल. तसेच अ‍ॅपच्या माध्यमातून चालणा-या टॅक्सींना केवळ मुंबई महानगरातच परवानगी देण्यात येईल, असे रावते म्हणाले. सरकारच्या प्रस्तावित धोरणामुळे सर्जच्या नावाखाली दुप्पट-तिप्पट भाडे वसूल करण्याचे प्रकार थांबणार आहेत. कायद्यातील पळवाटांचा आधार घेत सर्रास वाहतूक नियम तोडले जातात. त्यामुळे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार स्वत:चा कायदा आणणार आहे. त्यासाठी आगामी पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात सुधारणा विधेयक मांडण्यात येईल. केंद्रीय कायद्याच्या कक्षेबाहेर असणा-या बाबींचा समावेश या विधेयकात करण्यात येणार असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. द्रुतगती मार्गावर बेदरकारपणे वाहन चालविणा-यांवर तसेच वाहतूक नियमांचे भंग करणा-यांविरोधात परिवहन विभागाने ९ जून ते १७ जून दरम्यान विशेष मोहिम हाती घेण्यात आले होते. या मोहिमेत एकूण ४ हजार ९३२ वाहने दोषी आढळली असून त्यांच्याकडून तब्बल ६८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. तर, ३४ वाहने जप्त करण्यात आली.वाहन तपासणी मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी तपास पथकांच्या वाहनांवर व्हीडीओ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.पनवेल आणि पिंपरी चिंचवड परिवहन कार्यालयातील पथकांच्या वाहनांवर प्रायोगिक तत्वावर व्हिडीओ कॅमेरे बसवून वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहन तपासणी मोहिमेसाठी हा प्रयोग राज्यात प्रथमच करण्यात आला आहे. या व्हीडीओ कॅमे-यांच्या साहाय्याने लेन कटींग आणि वेग मर्यादेचे उल्लघंन करणा-या ११६५ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी ७५० वाहनमालकांना घरपोच नोटीसा देण्यात आल्या आहेत. तर उर्वरितांना नोटीसा पाठविण्याची कार्यवाही सुरु असल्याचे रावते यांनी सांगितले.