शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘ओला- उबर’ला मीटर टॅक्सींप्रमाणे परवानगी नाही, राज्य सरकारची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 04:30 IST

टुरिस्ट परवाना असलेल्या ओला, उबर टॅक्सी शहरांतर्गत काळ्या-पिवळ्या टॅक्सींप्रमाणे मीटरवर चालविण्यात येऊ शकत नाहीत, असे राज्य शासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

मुंबई : टुरिस्ट परवाना असलेल्या ओला, उबर टॅक्सी शहरांतर्गत काळ्या-पिवळ्या टॅक्सींप्रमाणे मीटरवर चालविण्यात येऊ शकत नाहीत, असे राज्य शासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले आहे. ओला, उबर टॅक्सींची शहरात मक्तेदारी असल्याने ते प्रवाशांची लूट आणि शोषण करतात. त्यामुळे त्यांची मक्तेदारी मोडण्यासाठी ‘सिटी टॅक्सी रुल्स, २०१७’ तयार करण्यात आले, असेही सरकारने सांगितले.‘सिटी टॅक्सी रुल्स, २०१७’ना ओला व उबरच्या काही टॅक्सी चालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र या दोन्ही अ‍ॅप बेस्ड टॅक्सी त्यांचे साम्राज्य अबाधित ठेवण्यासाठी या नियमांना विरोध करत आहेत, असा आरोप सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. सर्व प्रकारच्या टॅक्सींना समान पातळीवर आणण्यासाठी व प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, यासाठी हे नवीन नियम तयार करण्यात आल्याचे सरकारने न्या. शंतनू केमकर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला मंगळवारी सांगितले.नवीन नियमांमुळे नॅशनल टुरिस्ट परवाना असलेल्या अ‍ॅप बेस्ड टॅक्सींना शहरात टॅक्सी चालविण्यास मनाई आहे. त्यासाठी त्यांना काळ्या-पिवळ्या टॅक्सींप्रमाणे स्थानिक परवाना घेणे बंधनकारक आहे आणि या परवान्यासाठी ‘काळ्या-पिवळ्या’ टॅक्सींकडून घेतल्या जाणाºया शुल्कापेक्षा दहापट अधिक शुल्क अ‍ॅप बेस्ड टॅक्सींकडून आकारण्यात येणार आहे. मात्र, सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. ओला व उबर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे नियम मोडत असल्याचा आरोपही सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे.दरम्यान, सरकारी वकील जे. डब्ल्यू. मॅट्टोस यांनी दरनिश्चिती करण्यासाठी नेमलेल्या समितीने सोमवारी सरकारपुढे अहवाल सादर केल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या अहवालाचा अभ्यास करून उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागितली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत २१ नोव्हेंबर रोजी या याचिकांवर सुनावणी ठेवली आहे.

टॅग्स :OlaओलाUberउबर