शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना निष्काळजी भोवणार

By admin | Updated: June 8, 2016 02:08 IST

एपीएमसीमध्ये देखभाल व सुरक्षा विभागाच्या निष्काळजीपणामुळे प्रचंड अनधिकृत बांधकाम झाले आहे

नवी मुंबई : एपीएमसीमध्ये देखभाल व सुरक्षा विभागाच्या निष्काळजीपणामुळे प्रचंड अनधिकृत बांधकाम झाले आहे. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सचिवांनी मुख्य सुरक्षा अधिकारी व अधीक्षक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पाचही मार्केटमधील अभियंत्यांच्या तत्काळ बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे. महापालिकेची व एपीएमसीची परवानगी न घेताच अनेक व्यापाऱ्यांनी एक मजला वाढविला आहे. वास्तविक बाजार समितीच्या पाचही मार्केटला संरक्षण भिंत आहे. प्रत्येक आवक व जावक गेटवर चोवीस तास सुरक्षा रक्षक असतात. देखभाल शाखेतील अभियंत्यांची प्रत्येक मार्केटमध्ये नियुक्ती केली आहे. या दोन्ही विभागाच्या सहमतीशिवाय बांधकाम साहित्य मार्केटमध्ये येवूच शकत नाही. यामुळे सुरक्षा व देखभाल शाखेने अभय दिल्यामुळेच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिले होते. याविषयी दिलेल्या वृत्ताची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. अधीक्षक अभियंता व्ही. बी. बिराजदार व मुख्य सुरक्षा अधिकारी कर्नल अविनाश काकडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित विभागप्रमुख या नोटीसला काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मार्केटमधील एकही प्रकल्प वेळेत पूर्ण केलेला नाही. याशिवाय प्रत्येक मार्केटसाठी स्वतंत्र अभियंते असतानाही व्यापाऱ्यांनी वाढीव मजल्याचे बांधकाम कसे केले, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे सचिवांनी तडकाफडकी अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. वास्तविक सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या आस्थापना विभाग करते. परंतु अभियांत्रिकी विभागाच्या बदल्या नियमाप्रमाणे करण्याचे स्वातंत्र्य आस्थापना विभागाला नाही. अधीक्षक अभियंता कोणाची कुठे बदली करायची हे निश्चित करतात. आस्थापना शाखा फक्त बदलीचा आदेश काढण्याचे काम करत आहे.>...तर धान्य मार्केटमध्येही अतिक्रमणबाजार समितीमधील कांदा - बटाटा, भाजी, फळ व मसाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यापूर्वी मसाला मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या अभियंत्यांची धान्य मार्केटमध्ये बदली केली आहे. वास्तवित संबंधितांच्या कार्यकाळात मसाला मार्केटमध्ये वाढीव मजल्यांची कामे बिनधास्तपणे झाली. अतिक्रमण होत असताना काहीही कारवाई न करणारे अधिकाऱ्यांनी धान्य मार्केटमध्ये वर्णी लावल्याने तिथेही अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. >मुख्य सुरक्षा अधिकारी निमित्तमात्र बाजार समिती प्रशासनाने मुख्य सुरक्षा अधिकारी अविनाश काकडे यांनाही कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. काकडे हे मुख्य सुरक्षा अधिकारी असले तरी प्रत्यक्षात सुरक्षा विभागाची प्रमुख जबाबदारी के. के. रासकर व सी. टी. पवार या दोन अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. सचिवांनी ३० आॅक्टोबरला त्याविषयी लेखी आदेश काढला आहे. सर्व मार्केट, मध्यवर्ती सुविधागृह, चेकनाके यांची जबाबदारी या दोन्ही अधिकाऱ्यांची असणार आहे. बाजार आवारामध्ये काहीही तक्रारी आल्यास त्यांना वैयक्तिक जबाबदार धरले जाणार असल्याचा उल्लेख पत्रामध्ये होता. जर सर्व जबाबदारी दोन्ही अधिकाऱ्यांची असेल तर कारवाई किंवा कारणे दाखवा नोटीस मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.