शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
2
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
4
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
5
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
6
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!
7
१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
9
"घाबरू नका, प्रत्येक समस्येचे निराकरण होईल"; CM योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना दिला धीर
10
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
11
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
12
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
13
कॉलेजमधली एक भेट, फेसबुकवर मेसेज अन् मग...; संजू सॅमसनला असा मिळाला 'आयुष्याचा जोडीदार'
14
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी
15
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
16
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
17
Blood Moon: रविवारी आकाशात असेल ‘ब्लड मून’ची मेजवानी
18
पंजाबमध्ये पुरामुळे मोठं नुकसान, धावून आला अक्षय कुमार; नुकसानग्रस्तांसाठी ५ कोटींची मदत
19
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
20
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज

एसटी प्रवाशांची ‘अधिकृत’ लूट

By admin | Updated: July 10, 2014 02:35 IST

एसटी चालक-वाहकांकडून स्थानकांवर थांबा न देता खाजगी हॉटेलवर थांबा देण्यात येत असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.

सुशांत मोरे - मुंबई
एसटी चालक-वाहकांकडून स्थानकांवर थांबा न देता खाजगी हॉटेलवर थांबा देण्यात येत असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. वर्षानुवर्षे प्रवाशांकडून त्याबाबतच्या अनेक तक्रारी केल्यानंतरही ही लूट थांबत नव्हती. मात्र यावर तोडगा न काढता उलट खाजगी हॉटेल आणि मॉटेलवर यापुढे अधिकृत थांबा देण्याचा निर्णयच एसटी महामंडळाने घेतला. यासाठी महामंडळाकडून निविदा प्रक्रियेची जाहिरातही काढण्यात येत आहे. या निर्णयामुळे  प्रवाशांची मात्र ‘अधिकृत’ लूट होणार आहे.  
एसटी महामंडळाचा पसारा राज्यभर पसरला असून, वर्षाला 72 लाख प्रवासी त्याचा लाभ घेतात. मात्र एसटी गाडय़ांचे नसलेले नियोजन, न मिळणा:या सुविधा इत्यादी कारणांमुळे महामंडळाचे प्रवासी आणि उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे उत्पन्न आणि प्रवासी वाढवण्यासाठी महामंडळाकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. 
त्याचाच एक भाग म्हणून महामंडळाने खाजगी हॉटेल आणि मॉटेलवर एसटी बस गाडय़ांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लांब पल्ल्याच्या मार्गावर किंवा जवळच्या मार्गावर धावणा:या एसटी बसेस स्वत:चे स्थानक सोडून खाजगी हॉटेलवर थांबतात आणि त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागते, अशा अनेक तक्रारी महामंडळाकडे येत आहेत.   
मुंबई ते पुणो एक्स्प्रेस मार्गावर तर धावणा:या एसी शिवनेरी बसेसना खाजगी हॉटेलवर थांबा देण्यात येत असल्याने प्रवासी आणि 
चालक-वाहकांमध्ये वादही झाले आहेत. या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत महामंडळाने  खाजगी हॉटेल आणि मॉटेलवर थांबा देण्याचा अजब निर्णय घेतला आहे.  काही विभागाकडून निविदा प्रक्रियेची जाहिरातही काढण्यात आली आहे.   
 
मुंबई-पुणो-मुंबई एक्स्प्रेस मार्गावरील एसटी बसेसना थांबा देण्यासंदर्भात निविदा जाहिरातही काढली आहे. 
 
महामंडळाला हॉटेल चालकाकडून एका बसमागे ठरावीक रक्कम मिळणार आहे. त्यामुळे उत्पन्न होईल, असा उद्देश आहे. 
 
राज्यातील ज्या मार्गावर हॉटेलवर थांबा देण्याची गरज आहे त्या ठिकाणी थांबा देण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. यामागे महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे वाहतूक विभाग महाव्यवस्थापक सूर्यकांत अंबाडेकर यांनी सांगितले.
 
साधारण पाच वर्षापूर्वी मुंबई-पुणो एक्स्प्रेस वेवर एसटीच्या शिवनेरी बसेसना खाजगी हॉटेलवर थांबे देण्यात येत होते. एका बसमागे ठरावीक रक्कम महामंडळाला अदा करण्यात येत होती. मात्र हा मार्ग पाहता प्रवाशांना खानपाण सेवेसाठी दुसरा पर्याय नसल्याने हॉटेलचालकांनी अशी सेवा न देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर   हॉटेलचालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली.
 
महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील काही मार्गावर खाजगी हॉटेलवर अधिकृत थांबे यापूर्वी देण्यात आल्याचे अंबाडेकर यांनी सांगितले. पण असे अधिकृत थांबे कोणाच्या नजरेस कसे आले नाहीत, असे विचारले असता त्यांनी आपण पंढरपूरला आहोत, असे सांगून उत्तर देणो टाळले.  
 
एसटीवाहक आणि चालकांना मोफत जेवण तसेच अन्य काही आर्थिक सुविधा मिळत असल्यानेच  असे थांबे दिले जातात.