उदगीर (जि. लातूर) : उदगीर येथे चार दिवसांपूर्वी केलेल्या भाषणाने एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून पोलीस प्रशासनाने गुरुवारी सरकारी विधिज्ञांकडे गुन्हा दाखल करण्याबाबत अभिप्राय मागविला आहे़उदगीर येथे एमआयएमच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या सभेत ओवेसी यांनी ‘गळ्यावर सुरा ठेवला तरी भारत माता की जय म्हणणार नाही’, असे म्हटले होते. मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हिमायत बेग हा निर्दोष ठरेल, असे वक्तव्यही त्यांनी केले होते़ या वादग्रस्त विधानांवरून वादंग निर्माण झाला.या पार्श्वभूमीवर उदगीरच्या पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे़ त्यांच्याकडे आलेल्या विविध संघटनांच्या तक्रारींची दखल घेत सरकारी विधिज्ञांकडून अभिप्राय मागविला आहे़ ओवेसी यांच्या भाषणाची चित्रफीत पत्रासोबत जोडून त्याचा अभ्यास करण्याची विनंतीही करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
ओवेसींवर गुन्हा नोंदविण्याच्या हालचाली
By admin | Updated: March 18, 2016 02:26 IST