शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी आत्महत्येबाबत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 01:57 IST

आत्महत्येप्रकरणी पी. व्ही. पेवेकर आणि राजशेखर सिंग या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला.

डोंबिवली : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून ठाण्याच्या कामगार राज्य विमा निगममध्ये सहाय्यक पदावर काम करणाऱ्या अशोक पवार (५८) यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी पी. व्ही. पेवेकर आणि राजशेखर सिंग या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. पवार यांनी २१ जानेवारीला राहत्या घरी आत्महत्या केली. त्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी वरिष्ठ अधिकारी आत्महत्येला कारणीभूत असल्याचे म्हटले होते. चौकशीअंती महिनाभरानंतर या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा विष्णूनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. पवार मानसिक तणावाखाली होते. ते मार्च महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी ५ डिसेंबरला स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला. त्रासाबाबत त्यांनी तक्रार केली, परंतु तिची योग्य दखल न घेतल्याने पवारांना आत्महत्येचे पाऊल उचलावे लागल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. घटनास्थळी आढळलेल्या चिठ्ठीत पेवेकर आणि राजशेखर सिंग यांचा उल्लेख होता. पवार यांच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे चौकशी करून विष्णुनगर पोलिसांनी शनिवारी पेवेकर आणि सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)