शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाच ऐवजी सहा फुटांची गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करणे बंधनकारक असणार, राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
2
साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?
3
मोठी बातमी! टेकऑफनंतर चीनजवळ गायब झाले रशियन विमान, ५० प्रवाशांचे काय झाले? जाणून घ्या...
4
भाग्यवान! संपूर्ण आयुष्य गरिबीत काढलं, आता फळफळलं नशीब; रातोरात 'असा' झाला करोडपती
5
११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन
6
भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी
7
कोणाला हवा सोनम-राजचा जामीन?, राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट; ४० लाखाबाबत खुलासा
8
निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं?
9
'बिग बीं'पासून ते SRK पर्यंत अनेकांची गुंतवणूक, आता कंपनीचा येणार IPO; पाहा काय आहेत डिटेल्स?
10
१ कोटी कॅश, ७९ ATM कार्ड, ३० मोबाईल...; ऑनलाईन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, १६ जणांना अटक
11
अनिल अंबानी ग्रुपवर ED ची कारवाई, ३००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ५० ठिकाणी छापे
12
चॉकलेट, कार, व्हिस्की...; FTA करारानंतर स्वस्त होणार 'या' वस्तू; पण इंग्लंडला काय फायदा होणार?
13
कुणाल खेमूच्या 'कलयुग'मधली रेणुका आठवतेय का? इंडस्ट्रीला केला रामराम अन् बनली पोल डान्सर
14
Janhvi Kapoor : कल्याणमधील तरुणीला मारहाणीचा व्हिडिओ बघून संतापली जान्हवी कपूर, म्हणाली....
15
Jivati Puja 2025 : जिवतीचा कागद अमावस्येला लावावा की श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी? वाचा व्रतविधी आणि माहिती!
16
दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
17
हृदयद्रावक! वडिलांना चहा देऊन गेली अन्...; मासिक पाळीचा त्रास असह्य, मुलीने संपवलं आयुष्य
18
ऑनलाईन रमीच्या नादात शिक्षिका चोर बनली,बुरखा घालून ८ लाखांवर डल्ला मारला; चेहऱ्यावरील तीळामुळे सापडली
19
दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच...
20
‘ती’ मुलगी घरातच ठरली असुरक्षित; वडील, भावांसह चौघांचा ११ महिने लैंगिक अत्याचार

अधिकाऱ्यांनी फसविले मुख्यमंत्र्यांना !

By admin | Updated: September 5, 2015 01:35 IST

दुष्काळ पाहणीवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पाथर्डी तालुक्यातील सातवडला पोचला....गावात एकही टँकर नाही, हे ऐकताच मुख्यमंत्री भारावून गेले. कारण काय तर गावातील आदर्श जलमीटर योजना

अण्णासाहेब नवथर, अहमदनगरदुष्काळ पाहणीवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पाथर्डी तालुक्यातील सातवडला पोचला....गावात एकही टँकर नाही, हे ऐकताच मुख्यमंत्री भारावून गेले. कारण काय तर गावातील आदर्श जलमीटर योजना! मुख्यमंत्र्यांचे भारावलेपण अधिकच वाढले. त्यांनी तत्काळ घोषणा केली की ‘या योजनेचा आदर्श राज्यातील गावांनी घ्यावा!’ हीच आदर्श योजना मुख्यमंत्री गेल्यानंतर ‘लोकमत’ने केलेल्या तपासणीत ‘उघडी’ पडली. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चक्क कोरड्या उद्भवावरील बंद पडलेली, गंजलेली योजना आदर्श म्हणून दाखवत चक्क मुख्यमंत्र्यांचीच फसवणूक केल्याचे समोर आले.मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील दुसरा टप्पा पाथर्डी तालुक्यात होता. मुख्यमंत्री सातवड गावाच्या शिवारात शिरल्यापासून, या गावाने दुष्काळावर कशी मात केली याची घोकंपट्टी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून सुरु झाली होती. गावकुसावर असलेल्या बंधाऱ्याची पाहणी करून ताफा गावात शिरला़ शिवराम वाघ यांच्या पॉलिहाऊसची पाहणी झाली़ त्यानंतर हा ताफा गावातील जलमीटरची पाहणी करण्यासाठी निघाला़ अनिता वाघ यांच्या घरासमोरील नळाला बसविलेले मीटर पाहताच मुख्यमंत्री खूश झाले. तेवढ्यात गर्दीतून कोणीतरी ओरडले, ‘सांगा काय फायदा झाला?’ त्यावर ‘जलमीटरमुळे पाणीपट्टी ४० वरून ३० रुपये झाली़ पाण्याचीही मोठी बचत झाली़ पूर्वी ४०० लीटर पाणी घेत होतो़ मीटर बसविल्यापासून ३५० लीटरच पाणी घेतो़ मीटरचा चांगला फायदा झाला.’ असे भडाभडा त्या महिलेने सांगून टाकले. यामुळे मुख्यमंत्री अधिकच भारावले. त्यांनी तातडीने ‘सातवड गावाचा आदर्श राज्याने घ्यावा’, अशी घोषणाच करून टाकली. एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे वेगळीच कुजबुज सुरू होती. गावाला वर्षापासून पाणी नाही याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू झाली. पण ही चर्चा मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेलीच नाही. बंद पडलेल्या योजनेवर मीटर बसवून आदर्श योजनेचा खटाटोप गावकऱ्यांच्या बोलण्यातून समोर आला. ‘लोकमत’ने त्यानंतर रीतसर ही योजनाच तपासली. तेव्हा हा बनाव पूर्णपणे समोर आला. गावपुढाऱ्यांच्या मदतीने अधिकाऱ्यांनी चक्क राज्याच्याच मुख्यमंत्र्यांना फसविण्याचा प्रकार घडला. मुळात ज्या विहिरीवर ही योजना आहे, ती विहीर वर्षभरापासून बंद आहे. उपसा करणारी योजनाही गंज लागून बंद पडली आहे. ही योजना दशकभर जुनी आहे. सध्या गाव तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहे. त्यासाठी प्रशासनाकडे टँकरचे प्रस्ताव पाठविले आहेत, पण ते मंजूरच केले जात नाहीत, अशी तक्रारवजा माहिती प्रशासनातीलच एकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.