शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या समस्येला अधिकारीच जबाबदार

By admin | Updated: April 8, 2017 04:39 IST

अंबरनाथमधील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी अंबरनाथमध्ये आल्या

अंबरनाथ : अंबरनाथमधील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी अंबरनाथमध्ये आल्या होत्या. अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची माहिती घेतली जात असतानाच अंबरनाथमधील काँग्रेस नगरसेवकांनी थेट कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी कार्यालयात आल्याचे कळताच पाणीसमस्येने त्रस्त असलेल्या इतर पक्षांच्या नगरसेवकांनीही प्राधिकरणाचे कार्यालय गाठले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीसमस्येसोबतच अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. अंबरनाथ, बदलापूर आणि वांगणी येथील पाणीप्रकल्पाची माहिती घेण्यासाठी अधीक्षक अभियंता मनीषा पालांडे या अंबरनाथमध्ये आल्या होत्या. कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात यासंदर्भात बैठक सुरू होती. याच वेळी पाणीसमस्येची आणि दोन वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या योजनेची तक्रार करण्यासाठी नगरसेवक प्रदीप पाटील, उमेश पाटील, चरण रसाळ, विलास जोशी हे प्राधिकरणाच्या कार्यालयात आले होते. या वेळी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने या सर्व नगरसेवकांनी पालांडे यांची भेट घेत त्यांच्यापुढे तक्रार केली. वरिष्ठ अधिकारी आल्याचे कळताच पाणीपुरवठा सभापती रेश्मा गुडेकर आणि भाजपाचे नगरसेवक वसंत पाटील हेही अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले. या वेळी सर्व नगरसेवकांनी चिंचपाडा येथील पाण्याच्या टाकीची आणि नवीन भेंडीपाडा येथून येणाऱ्या जलवाहिनीच्या रखडलेल्या कामाची तक्रार पालांडे यांच्याकडे केली. दोन वर्षे हे काम रखडल्यानेच पश्चिम भागाला पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी अन्य अधिकारीही उपस्थित होते. (प्रतिनिधी)>पाणी विकतातप्राधिकरणाचे स्थानिक अधिकारी हे काही बिल्डरांना पाणी विकत असल्याचा आरोप या वेळी केला. तसेच पाणीचोरीचे प्रकार उघड केल्यावरही त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. रात्री १२ नंतर बिल्डरांना पाणी पुरवण्याचे काम अधिकारी करत असल्याचे पाटील यांनी पालांडे यांच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात पालांडे यांनी लागलीच चौकशी करण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. शहरातील पाण्याचे पुन्हा नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. जलवाहिनी टाकण्याचे थांबलेले काम त्वरित सुरू करण्यासाठी योग्य ते आदेश येत्या काही दिवसांत निश्चित दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.