शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निधी देण्याचा प्रस्ताव फेटाळला

By admin | Updated: May 19, 2016 02:15 IST

लोणावळा ते पुणेदरम्यान नवीन ट्रॅक टाकण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३९२ कोटी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला

पुणे : लोणावळा ते पुणेदरम्यान नवीन ट्रॅक टाकण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३९२ कोटी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. मात्र, हा ट्रॅक टाकण्यासाठी पालिकेने का निधी द्यायचा, असा प्रश्न उपस्थित करून स्थायी समितीच्या सदस्यांनी मंगळवारी हा प्रस्ताव फेटाळून लावला.पुणे ते लोणावळा मार्गावर प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. त्यामुळे या मार्गावर नवीन ट्रॅक टाकण्याचा निर्णय पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) बैठकीत घेण्यात आला आहे. या नवीन ट्रॅकसाठी २ हजार ३०६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकल्पाचा निम्मा खर्च राज्य शासन करणार असून उर्वरित खर्च पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएच्या संयुक्त विद्यमाने करण्यात यावे, असे ठरले होते. त्यानुसार पुणे महापालिकेला ३९२ कोटी रुपये द्यावे, असा निर्णय घेण्यात आला होता.महापालिका प्रशासनाने त्यानुसार प्रस्ताव तयार करून तो स्थायी समितीसमोर सादर केला होता. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पासाठी महापालिकेने का पैसे द्यावेत, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. शहरातील सर्व निवासी व व्यावसायिक मिळकतींचे जीआयएस मॅपिंग करून त्यानुसार मिळकत कर वसुली करण्यासाठी सार आयटी रिसोर्सेस या कंपनीसमवेत जवळपास २३ कोटींचा करार करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली.महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडे तब्बल ८.२ लाख मिळकतीची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षा खूप अधिक मिळकती शहरात आहेत, त्यांची नोंद झाली नसल्यामुळे पालिकेचे दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न बुडते. (प्रतिनिधी)