शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर आक्षेपार्ह शेरा

By admin | Updated: May 20, 2017 01:36 IST

नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ स्कूलने पालकांना धडा शिकविण्याच्या हेतूने थेट विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवरच आक्षेपार्ह शेरा दिला आहे. दोन वर्षांपासून फी वाढीच्या निर्णयाविरोधात

- लोकमत न्यूज नेटवर्क

पनवेल : नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ स्कूलने पालकांना धडा शिकविण्याच्या हेतूने थेट विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवरच आक्षेपार्ह शेरा दिला आहे. दोन वर्षांपासून फी वाढीच्या निर्णयाविरोधात पालकांनी आंदोलन केले होते. पालकांच्या या भूमिकेमुळे शाळेने विद्यार्थ्यांच्या मार्कलिस्टवर ‘प्रॉब्लेमॅटिक पेरेंट्स फीस नॉट पेड’असे लिहिले आहे. सरकारच्या नियमानुसार, दोन वर्षातून एकदा १५ टक्क्यांपर्यंत फीवाढ करता येते. मात्र, ही शाळा दरवर्षी मोठ्या पमाणात फी वाढ करीत होती. साधारण महिन्याला ८०० ते १००० रुपये फी असायला हवी होती. शाळेने ती १६०० ते १८०० रुपयांवर नेऊन ठेवली आहे. या विरोधात पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा लढा सुरू आहे. पालकांनी शिक्षण अधिकारी आणि शिक्षणमंत्र्यांकडे शाळेविरोधात तक्रार दाखल केली होती. शिक्षणमंत्र्याकडे झालेल्या बैठकीत पुढील निर्णय होत नाही, तोपर्यंत वाढीव फी वसूल करू नये, असे आदेश दिले होते. मात्र, या निर्णयाला हरताळ फासत, शाळा व्यवस्थापनाने फी वसूल करण्यास सुरुवात केली. फी न भरणाऱ्या पालकांना वकिलामार्फत नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत देत, वकिलाची फी ही पालकांकडूनच वसूल करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर, ज्या पालकांनी शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलने केली होती, त्यांच्या मुलांच्या मार्कशीटवर ‘प्रॉब्लेमॅटिक पेरेंट्स फीस नॉट पेड’ असा शेरा लाल पेनने लिहिला आहे. शाळेच्या या कृतीचा पालकांनी निषेध केला आहे. आपल्या मुलाची आणि आपली शाळेने मानहानी केली असून, शाळेविरोधात अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात करणार आहेत.६०पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर हा शेरा लिहिला असल्याचे पालक गौरव कदम यांनी सांगितले. या संदर्भात पोलीस ठाण्यातदेखील तक्र ार दाखल केली आहे. पालकांच्या पाठीशी शिवसेना - सेंट जोसेफ शाळेच्या या वागण्यामुळे दुखावलेल्या पालकांशी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. शाळेच्या निर्णयाविरोधात शिवसेना पालकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले, तसेच सेनेचे संपर्कप्रमुख आदेश बांदेकर यांनी पालकांना एकत्र बोलावून बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले.