शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शिवाजीराव निलंगेकरांविरोधात गुन्हा

By admin | Updated: March 9, 2017 01:52 IST

मराठवाडा मित्र मंडळाला देय असलेल्या ५ कोटी ६० लाख १ हजार २६० रुपये आणि ३ लाख ६९ हजार चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळाचा आर्थिक फायद्यासाठी अपहार केल्याच्या

मुंबई : मराठवाडा मित्र मंडळाला देय असलेल्या ५ कोटी ६० लाख १ हजार २६० रुपये आणि ३ लाख ६९ हजार चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळाचा आर्थिक फायद्यासाठी अपहार केल्याच्या आरोपाखाली माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्याविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी निलंगेकर यांच्यासह मे. समृद्धी आर्केड प्रा.लि., मे. अगरवाल कन्स्ट्रक्शन कंपनी आणि कंपनीच्या भागीदारांविरोधातही २८ फेब्रुवारीला गुन्हा नोंद झाला आहे. मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. के.बी. पाटील यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.पाटील म्हणाले की, मंडळाने शासनाकडून खेरवाडी परिसरातील चेतना महाविद्यालयासमोरील एक जागा नाममात्र दराने घेतलेली होती. त्या ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालय, एमबीए महाविद्यालय आणि वसतिगृह तयार करण्याचा मानस होता. त्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने शासनाने विशेष बाब म्हणून मंडळास अधिक चटई क्षेत्र दिले. मात्र त्रिपक्षीय करार करताना मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष निलंगेकर यांनी कार्यकारिणीला अंधारात ठेवून व्यवहार केल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे. यामुळे मंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. परिणामी, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. (प्रतिनिधी)