शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

दिवाळीच्या औचित्याने 'A soulful Diwali - खरे प्रकाशपर्व' या लघुपटातून 'राम बंधु'ची कोव्हिड योद्ध्यांना अनोखी मानवंदना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 16:47 IST

कोरोना महामारीच्या कालावधीत डॉक्टर, पोलीस या कोव्हिड योद्ध्यांप्रमाणेच स्थानिक किराणा दुकानदार, दूधवाले, भाजीवाले, सफाई कामगार यांनीही अविरत कार्य केले. त्यांच्या सन्मानार्थ हृदयाला स्पर्श करणारा हा लघुपट तयार करण्यात आला आहे.

>> किराणा दुकानदार, दूधवाले, भाजीवाले, सफाई कामगार इत्यादी कोव्हिड योद्धा असल्याची लघुपटाची मध्यवर्ती संकल्पना>> नामांकित अभिनेते शिवाजी साटम आणि किशोर कदम यांच्या मुख्य भूमिका मुंबई: राम बंधु या फ्लॅगशिप ब्रॅन्डसाठी प्रसिद्ध असलेल्या 'एम्पायर स्पाइसेस अँड फुड्स लिमिटेड' (ईएसएफएल) या भारतातील आघाडीच्या फूड (FMCG) कंपनीने दिवाळीच्या औचित्याने 'A soulful diwali - खरे प्रकाशपर्व' हा मराठी लघुपट प्रदर्शित केला आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत डॉक्टर, पोलीस या कोव्हिड योद्ध्यांप्रमाणेच स्थानिक किराणा दुकानदार, दूधवाले, भाजीवाले, सफाई कामगार यांनीही अविरत कार्य केले. हे सुद्धा कोव्हिड योद्धा असून त्यांना आधार देत त्यांच्या सन्मानार्थ हृदयाला स्पर्श करणारा हा लघुपट तयार करण्यात आला आहे. त्यांच्या सन्मानार्थ यंदाच्या दिवाळीत एक दिवा लावू, असा अनोखा संदेशही देण्यात आला आहे.

या लघुपटात एका किराणा दुकानदाराची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ही भूमिका नामांकित अभिनेते किशोर कदम यांनी साकारली आहे. गोकुळधाम सोसायटीमधील किराणा दुकान आणि या दुकानमालकाची चिंता या लघुपटातून मार्मिकपणे दाखविण्यात आली आहे. "या महामारीशी लढा देण्यासाठी आपल्याला मदत करणाऱ्या अगणित कोव्हिड योद्ध्यांच्या आपण ऋणात आहोत, अशी राम बंधुमधील सर्व सदस्यांची भावना आहे. या लघुपटाच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची होती आणि म्हणूनच यंदाच्या दिवाळीमध्ये आपल्या परिसरातील कोव्हिड योद्धा, स्थानिक किराणा दुकानदार, दूधवाले, भाजीवाले, सफाई कामगार आणि इतर योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी आपण एक दिवा लावूया", असे आवाहन ईएसएफएलचे अध्यक्ष हेमंत राठी यांनी केले आहे. 

या लघुपटाबाबत प्रतिक्रिया देताना ईएसएफएलचे व्यवस्थापकीय संचालक उमेश राठी म्हणाले, "महामारीच्या काळात छोट्या व्यावसायिकांना फटका बसला आणि त्याच्या झळा अजूनही सोसाव्या लागत आहेत. आपले स्वतःचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात घालून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी स्थानिक किराणा दुकानांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अशा नि:स्वार्थी योद्ध्यांना या लघुपटाच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली आहे."

"या लघुपटाची कथा मनाला इतकी भावली की, माझे वेळापत्रक व्यस्त असूनही मी याला नकार देऊ शकलो नाही. या दिवाळीमध्ये राम बंधु सारख्या प्रस्थापित ब्रँडने अशा प्रकारचा संदेश देण्याचे ठरविले, याचे मला कौतुक वाटते. अशा उदात्त उपक्रमाचा एक भाग झाल्याचा मला खूप आनंद आहे", अशा भावना अभिनेता शिवाजी साटम यांनी व्यक्त केल्या.

व्हाईटलाइन स्टुडियोने या लघुपटाची निर्मिती केली आहे. व्हाईटलाइन स्टुडियोजचे क्रिएटिव्ह प्रमुख हेमंत बेळे म्हणाले, “दिवाळीच्या औचित्याने राम बंधुतर्फे प्रदर्शित करण्यात आलेला ‘A soulful diwali - खरे प्रकाशपर्व’ हा लघुपट म्हणजे कोव्हिड योद्ध्यांची दखल घेण्याचा आणि ही दिवाळी प्रेम, प्रकाश आणि कृतज्ञतेची भावना मनात ठेवून साजरी करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.”

"सामाजिक संदेश असलेल्या अशा लघुपटाचा भाग असणे आणि एका कोव्हिड योद्ध्याची भूमिका साकारण्याची संधी मिळणे हा माझा बहुमान आहे", असे अभिनेते किशोर कदम म्हणाले.

राम बंधुने अलीकडेच त्यांच्या पापड आणि लोणच्यांच्या ब्रँडसाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित- नेने यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. 

ईएसएफएलच्या ब्रँड पोर्टफोलियोमध्ये राम बंधु, आरबीएम, टेम्प्टीन आणि जायका या ब्रॅंड्सचा समावेश आहे. हे सर्व ब्रँड्स त्यांच्या दर्जेदार गुणवत्ता, चव, विविधता आणि स्वयंपाकात सुलभता यासाठी लोकप्रिय आहेत. या कंपनीने भारतातील १२ राज्यांमधील पाच लाख किरकोळ दुकानांच्या माध्यमातून आपले जाळे विस्तारले आहे. त्याचप्रमाणे त्यांचे १०००+ वितरकांचे बळ असून ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादने आणि चविष्ट पदार्थ पोहोचवत आहेत. या कंपनीतर्फे यूएस, यूके, कतार, दुबई, कॅनडा, जर्मनी, नेदरलँड्स, लक्झम्बर्ग, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि बहारिन येथे उत्पादने निर्यात करण्यात येतात.