शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामांवर स्थगिती देण्यास स्पष्ट नकार

By admin | Updated: February 17, 2016 03:23 IST

मुंबईतील डम्पिंग ग्राऊंडची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत आहे. तर दुसरीकडे बेसुमारपणे नवीन बांधकामे उभी राहात आहेत. त्यामुळे डम्पिंग ग्राऊंडच्या समस्येवर

मुंबई : मुंबईतील डम्पिंग ग्राऊंडची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत आहे. तर दुसरीकडे बेसुमारपणे नवीन बांधकामे उभी राहात आहेत. त्यामुळे डम्पिंग ग्राऊंडच्या समस्येवर ठोस तोडगा निघेपर्यंत मुंबईत नवीन बांधकामे करण्यास स्थगिती देणार का? असा सवाल उच्च न्यायालयाने सरकारला केला होता. त्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करत मुंबईतील नव्या बांधकामांना स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला. या स्थगितीमुळे कृत्रिमरीत्या घराच्या किंंमती वाढवण्यात येतील, अशी भीती सरकारने व्यक्त केली. त्यामुळे उच्च न्यायालयाने मंगळवारी या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.देवनार व मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपल्याने या दोन्ही डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास मुदतवाढ द्यावी. तसेच राज्य सरकारला अन्य ठिकाणी डम्पिंग ग्राऊंडसाठी पुरेशी जागा देण्याचे आदेश द्यावेत, यासाठी मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात नोटीस आॅफ मोशन दाखल केले आहे. या मोशनवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे होती.गेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने अन्य ठिकाणी डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा देऊन हा प्रश्न सुटण्यासारखा नाही, असे मत व्यक्त करत राज्य सरकारला यावर ठोस तोडगा निघेपर्यंत मुंबईमध्ये नवीन बांधकामांना स्थगिती देण्यात येणार का? अशी विचारणा करत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला होता.मंगळवारच्या सुनावणीवेळी महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी सरकार नव्या बांधकामांस स्थगिती देऊ इच्छित नाही, असे स्पष्ट करत राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांचे प्रतिज्ञापत्र खंडपीठासमोर सादर केले.‘सरकारने एमआरटीपी कायद्याअंतर्गत १५ फेब्रुवारी रोजी एक परिपत्रक काढले आहे. महापालिकेला ओला व सुका कचरा वेगळा करून त्याचे विकेंद्रीकरण पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ज्या कॉम्पलेक्समध्ये मनोरंजन पार्कसाठी जागा दिली आहे, अशा कॉम्पलेक्समध्ये प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे आदेश देण्यासही महापालिकेला सांगितले आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश महापालिकेला दिला आहे. त्याशिवाय महापालिकेला तळोजा येथे डम्पिंग ग्राऊंडसाठी ५२ हेक्टर जागा देण्यात येईल. त्यामुळे यावर पर्याय निघण्याची शक्यता आहे,’ असे अ‍ॅड. अणे यांनी खंडपीठाला सांगितले.त्यावर महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील एस. यु. कामदार यांनी परिपत्रकामधील अटींचा समावेश कायद्यात करावी, अशी मागणी सरकारकडे केली. ‘घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणखी २-३ वर्षे शक्य नाही. लोकसंख्या वाढत जाणार. परिस्थिती किती भयानक होईल, याची कल्पना आहे का?’ असे खंडपीठाने म्हटले.त्यावर महापालिकेने डम्पिंग ग्राऊंडसाठी आणखी ५० हेक्टर जागेची आवश्यकता असल्याचे खंडपीठाला सांगितले. येत्या दोन वर्षात १४ हजार टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कांजुरमार्ग डंम्पिग ग्राऊंडवर यंत्रणा उभारण्यासाठी आणखी सहा महिने लागतील. तर देवनार डम्पिंग ग्राऊंडवर प्रक्रिया केंद्र सुरु करण्यासाठी तीन वर्षे लागतील. त्यानंतर हळुहळू येथील कचरा हलवला जाईल आणि मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेने खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)