शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील साफसफाईवर लक्ष द्यावे

By admin | Updated: June 27, 2016 01:57 IST

पालिका अतिक्रमण तोडण्यात मग्न असल्याने साफसफाईचा बोजवारा उडाला असल्याची टीका आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.

नवी मुंबई : पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याऐवजी पालिका अतिक्रमण तोडण्यात मग्न असल्याने साफसफाईचा बोजवारा उडाला असल्याची टीका आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. पालिकेने पावसाळी शेडला परवानगी नाकारल्याच्या धोरणालाही विरोध दर्शविला असून, दुकानदारांचे नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला आहे. पहिल्याच पावसामध्ये पालिकेचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. पावसाळापूर्व नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्याने शहरात अनेक ठिकाणी रोडवर पाणी साचले आहे. सीबीडी सेक्टर ४, ५ व ६ मध्ये शनिवारी पाणी भरल्यामुळे नागरिकांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे धाव घेतली होती. नागरिकांनी हा प्रकार निदर्शनास आणून देताच म्हात्रे यांनी रविवारी सकाळी पाहणी दौऱ्याचे आयोजन केले. गटारांची साफसफाई झालेली नाही. अनेक ठिकाणी गाळ साचला आहे. गटारातील पाणी रोडवरून वाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सेक्टर ६ मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. येथील मीनाक्षी हॉटेलच्या बाजूला गटारावरील झाकण उघडे असल्याचे निदर्शनास आले. खड्ड्यात पडून नागरिक जखमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लहान मुलांचा जीव जाण्याची भीती असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. सीबीडी परिसरातील हॉटेल व इतर व्यावसायिकांनी मंदा म्हात्रे यांच्याकडे त्यांच्या व्यथा मांडल्या. आयुक्तांनी पावसाळी शेडला परवानगी नाकारली आहे. यामुळे पावसाचे पाणी दुकानामध्ये येत असून नुकसान होऊ लागल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी मंदा म्हात्रे यांनी पालिकेच्या कारभारावर सडकून टीका केली.>साफसफाई करण्याऐवजी अतिक्रमण हटविण्यात प्रशासन मग्न झाल्याने नालेसफाईचा बोजवारा उडाला आहे. पावसाळी शेडला परवानगी नाकारल्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होणार असून, पनवानगी न देण्याच्या धोरणाला आमचा तीव्र विरोध आहे. - मंदा म्हात्रेआमदार, बेलापूर मतदारसंघ