शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमध्ये अश्लील वर्तन; प्रभूंच्या ट्विटनंतर गुन्हा दाखल

By admin | Updated: July 11, 2017 05:21 IST

महिलेला पाहून अश्लील वर्तन करण्यात आलेल्या प्रकरणाची रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गंभीर दखल घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकलमधून चर्चगेट ते बोरीवली प्रवास करणाऱ्या महिलेला पाहून अश्लील वर्तन करण्यात आलेल्या प्रकरणाची रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, असे आदेश प्रभू यांनी ट्विट करून दिले. रेल्वेमंत्र्यांचे आदेश प्राप्त होताच बोरीवली स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.महाविद्यालयीन शिक्षण घेणारी २२ वर्षीय तरुणी चर्चगेट ते बोरीवली असा प्रवास करत होती. दिव्यांग डब्याला जोडून असलेल्या महिलांसाठीच्या राखीव डब्यातून ही तरुणी प्रवास करत असताना कांदिवली ते बोरीवली स्थानकांदरम्यान दिव्यांग डब्यातून प्रवास करणाऱ्या विकृताने प्रवासी तरुणीकडे पाहत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर प्रवास करणाऱ्या तरुणीकडे पाहून अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी तरुणीने रेल्वे हेल्पलाइनशी संपर्क साधला. हकिकत सांगितल्यानंतर संबंधित व्यक्तीने मदत करण्याऐवजी हे प्रकरण हसण्यावारी नेले, असा आरोप तरुणीने केला आहे. तरुणीने वैतागून फोन कट केला. दरम्यान, या घटनेबाबत संबंधित तरुणीशी ‘लोकमत’ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र याबाबत तिने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यानंतर तरुणीने फेसबूकच्या माध्यमातून या घटनेला वाचा फोडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टची सुरेश प्रभू यांनी तत्काळ दखल घेतली. टिष्ट्वटच्या माध्यमाने प्रभंूनी चौकशीचे आदेश दिले आहेत.या प्रकरणी रेल्वे पोलीस सीसीटीव्हीच्या फूटेजच्या मदतीने अधिक तपास करत आहेत>‘हसलो नाही’ आरपीएफचे टिष्ट्वटलोकलमधील त्या तरुणीच्या फोनचे संभाषण रेकॉर्ड झाले आहे. ते संभाषण तपासले असता संबंधित व्यक्ती हसली नसल्याचा दावा आरपीएफच्या वतीने करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मुंबई विभागीय रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकृत टिष्ट्वटर अकाउंटवरून या आशयाचे टिष्ट्वट करण्यात आले आहे. हे टिष्ट्वट थेट मुख्यमंत्री कार्यालयासह रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनादेखील टॅग करण्यात आले आहे.