शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुरोहितच्या जामिनावर आक्षेप

By admin | Updated: February 17, 2017 03:13 IST

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्याविरुद्ध सकृतदर्शनी पुरावे आहेत, असे म्हणत राष्ट्रीय तपास पथकाने

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्याविरुद्ध सकृतदर्शनी पुरावे आहेत, असे म्हणत राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) पुरोहितच्या जामीन अर्जावर गुरुवारी उच्च न्यालयात आक्षेप घेतला.एनआयएने मकोका हटवल्यानंतर पुरोहितने विशेष एनआयए न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र विशेष न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका करण्यास नकार दिल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.पुरोहितवर हत्या, धोकादायक शस्त्रांनी लोकांना जखमी करणे, धर्म, जात, भाषा, इत्यादीवरून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे इत्यादी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गुरुवारच्या सुनावणीत पुरोहितचे वकील श्रीकांत शिवडे यांनी पुरोहितवर मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला नसल्याची माहिती न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाला दिली.‘पुण्याच्या एका केससंदर्भात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत पुरोहितला अटक करण्यात आली. मात्र त्याला मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी बेकायदा अटक करण्यात आली,’ असा युक्तिवाद शिवडे यांनी केला.त्यावर एनआयचे वकील संदेश पाटील यांनी आक्षेप घेतला. ‘पुरोहितवर गंभीर आरोप असून ते सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे तपासयंत्रणेकडे आहेत,’ असे पाटील यांनी खंडपीठाला सांगितले.‘एटीएसने सादर केलेल्या दोषारोपपत्रावर आम्ही काही अंशी अवलंबून आहोत. कारण त्यांनी केलेल्या तपासापुढे आम्ही तपास केला. त्यांच्या तपासात काही त्रुटी आढळल्याने आम्ही काही आरोपी आणि दोन साक्षीदारांचा पुन्हा एकदा जबाब नोंदवला,’ असा युक्तिवाद पाटील यांनी केला.तसेच युएपीए अंतर्गत नोंदवलेला गुन्हा अजामिनपात्र करण्याची तरतूद आपल्याला लागू होत नाही, असा युक्तिवादही शिवडे यांनी केला. ‘युएपीएची सुधारित तरतूद पूर्वलक्षित प्रभावाने लागू केली जाऊ शकत नाही. तसेच या तरतुदीनुसार युएपीए लागू करण्यासाठी विशेष समितीची मंजुरी घेणे आवश्यक आहे. मात्र जानेवारी २००९ मध्येही समितीच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे सुधारित तरतूदीनुसार परोहितला जामीन नाकारणे बेकायदा आहे,’ असा युक्तिवाद शिवडे यांनी गेल्या सुनावणीत केला होता.त्याला उत्तर देताना पाटील यांनी ही बाब जामीन अर्जाच्या सुनावणीत लक्षात न घेता खटल्यावेळी त्यावर विचार करता येईल, असे खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने ही युएपीएची नवी तरतूद अवैध असल्याचे मत व्यक्त केले. शुक्रवारी या अर्जावर पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)